आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रिकेट:भारतीय संघ 19 वर्षांनंतर हेडिंग्लेवर कसाेटी खेळणार, उद्यापासून भारत-इंग्लंड तिसरी कसाेटी

लीड्स2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

लाॅर्ड््सवरील राेमहर्षक विजयाने फाॅर्मात आलेला भारतीय क्रिकेट संघ आता तिसऱ्या कसाेटीत यजमान इंग्लंडला धूळ चारण्यासाठी उत्सुक आहे. उद्या बुधवारपासून भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसाेटीला सुरुवात हाेणार आहे. या कसाेटीसाठी भारतीय संघ तब्बल १९ वर्षांनंतर लीड्सच्या हेडिंग्लेच्या मैदानावर उतरणार आहे. यापूर्वी माजी कर्णधार गांगुलीच्या नेतृत्वात टीम इंडियाने या मैदानावर आपली शेवटची कसाेटी २००२ मध्ये खेळली हाेती. त्यात भारताने डाव व ४६ धावांनी इंग्लंडला पराभूत केले हाेते. या विजेत्या संघातील एकही सदस्य खेळाडू आता टीममध्ये सहभागी नाही. या कसाेटीत भारताकडून सचिन, राहुल द्रविड आणि गांगुलीने प्रत्येकी एक शतक झळकावले हाेते. त्यामुळे आता पुन्हा या मैदानावर विजयाचा कित्ता गिरवण्यासाठी कर्णधार विराट काेहली उत्सुक आहे. त्याच्या नेतृत्वाखाली गत दुसऱ्या कसाेटीत भारताला १५१ धावांनी राेमहर्षक विजयाची नाेंद करता आली. सध्या भारतीय संघातील युवा फलंदाजही चांगलेच फाॅर्मात आहेत.

जडेजा अपयशी; अश्विनला मिळणार संधी
इंग्लंड संघाविरुद्ध अद्याप टीम इंडियाच्या रवींद्र जडेजाला गाेलंदाजीत अपेक्षित खेळी करता आली नाही. त्यामुळे त्याला विश्रांती दिल्या जाण्याची शक्यता आहे. त्याच्या जागी आर.अश्विनला संधी मिळू शकेल. यासाठी शार्दूल ठाकूरही शर्यतीत आहे.

यजमान अडचणीत : दुखापतीमुळे मार्क वुड बाहेर; स्टुअर्ट ब्राॅडही जायबंदी
जायबंदी खेळाडूमुळे सध्या यजमान इंग्लंडचा संघ चांगलाच अडचणीत सापडला आहे. टीमचा वेगवान गाेलंदाज मार्क वुड खांद्याच्या गंभीर दुखापतीमुळे या कसाेटीला मुकणार आहे. लाॅर्ड््सवरील कसाेटी त्याने शानदार पाच विकेट घेतल्या हाेत्या. दुसरीकडे भारतविरुद्ध यशस्वी ठरलेल्या गाेलंदाज स्टुअर्ट ब्राॅडलाही दुखापतीचा फटका बसला. ताे मालिकेतून बाहेर पडला आहे.

१० पैकी ५ कसाेटीत इंग्लंड पराभूत
यजमान इंग्लंड संघाची हेडिंग्ले मैदानावर चांगलीच कसाेटी लागणार आहे. कारण, या मैदानावर इंग्लंडला अद्याप समाधानकारक कामगिरी करता आली नाही. इंग्लंडने या मैदानावर झालेल्या आतापर्यंतच्या दहापैकी पाच कसाेटीत पराभवाचा सामना केला. चार कसाेटीत विजयाची नाेंद करता आली. एक कसाेटी अनिर्णीत राहिली हाेती. इंग्लंडला या मैदानावर आॅस्ट्रेलिया, श्रीलंका, दक्षिण आफ्रिका आणि विंडीज संघाविरुद्ध कसाेटीमध्ये पराभव पत्करावा लागला. त्यामुळे आता या मैदानावर विजयाची नाेंद करण्याचा यजमानांचा मानस आहे. मात्र, यासाठी संघाला माेठी कसरत करावी लागणार आहे.

बातम्या आणखी आहेत...