आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
भारतीय संघाला यंदाच्या माेसमामध्ये उल्लेखनिय कामगिरीमधील सातत्य कायम ठेवण्याची संधी आहे. कारण ,या सत्रामध्ये टीम इंडिया तिन्ही फाॅरमॅटमधील सामन्यांसाठी मैदानावर दिसणार आहे. यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने २०२१ च्या सत्राचे वेळापत्रक जाहीर केले. यादरम्यान वर्षभर संघ अतिशय व्यग्र आहे. भारताचा संघ नव्या वर्षात २१ टी-२०, १२ एकदिवसीय, १६ कसोटीत आपले काैशल्यपणास लावेल. याशिवाय टीमला चार विदेश दाैरा करणारा लागणार आहे. त्याचबरोबर आपले खेळाडू आयपीएल, टी-२० आशिया कप आणि ऑक्टोबर-नोव्हंेबरमध्ये होणाऱ्या टी-२० विश्वचषकातही उतरतील.
संघ नव्या वर्षातील पहिला सामना ७ जानेवारी रोजी खेळेल. तसेच संघाने जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अव्वल-२ मध्ये स्थान मिळवल्यास त्यांना जूनमध्ये अंतिम सामना खेळावा लागेल. त्यामुळे या चॅम्पियनशिपची फायनल गाठण्याकडे टीम इंडियाची नजर लागली आहे.
श्रीलंका, इंग्लंड, आफ्रिका व झिम्बाव्वेच्या दाैऱ्यावर टीम इंडिया
जानेवारी : ऑस्ट्रेलियात संघाला दोन कसोटी सामने खेळायचे आहेत. तिसरी कसोटी ७ जानेवारीला सिडनीत आणि चौथी कसोटी १५ जानेवारी रोजी गाबामध्ये खेळवली जाईल.
- फेब्रुवारी-मार्च : इंग्लंडचा भारत दौरा : इंग्लंड संघ भारतीय दौऱ्यावर असेल. ४ कसोटी, ३ वनडे व ५ टी-२० सामने. सर्व टी-२० सामने अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियममध्ये.
एप्रिल-मे : आयपीएल एप्रिल-मे महिन्यात होऊ शकते. या टी-२० लीगमध्ये ६० सामने होतील. फेब्रुवारीत छोटा लिलाव होईल. लीगमध्ये भारताचे सर्व दिग्गज खेळाडू खेळतील.
जून : श्रीलंका दौरा : भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यात ३ एकदिवसीय व ५ टी-२० सामने खेळेल.
जून-जुलै : टी-२० आशिया कप : श्रीलंकेत टी-२० आशिया. संघाला या स्पर्धेत कमीत कमी ६ सामने खेळावे लागणार आहेत.
जुलै : भारताचा झिम्बाब्वे दौरा : झिम्बाब्वे दौऱ्यात ३ वनडे सामने खेळायचे आहेत.
ऑगस्ट-सप्टेंबर : भारताचा इंग्लंड दौरा : दौऱ्यात ५ कसोटी खेळेल.
ऑक्टोबर : आफ्रिकेचा भारत दौरा : ३ वनडे व ५ टी-२० खेळायचे आहेत.
ऑक्टोबर-नोव्हेंबर : भारतात सलग दुसऱ्यांदा टी-२० वर्ल्डकप आयोजन .१६ संघ सहभागी.
- नोव्हेंबर डिसेंबर : न्यूझीलंडचा भारत दौरा : या दौऱ्यात संघ २ कसोटी व ३ टी-२०.
- डिसेंबर : भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा : टीम इंडिया या दौऱ्यात ३ कसोटी आणि ३ टी-२० सामने खेळवले जातील.
दुखापतीमुळे खेळाडूंचा बदल महत्त्वाचा :
देशात टी-२० विश्वचषक होणार आहे. अशात खेळाडूंना दुखापतीपासून वाचण्यासाठी मंडळ बदली पद्धत लागू करू शकते. खेळाडूला सलग दौऱ्यावर सामने खेळता येणार नाहीत. नव्या खेळाडूंना संधी दिली जाईल. सध्या आयपीएल ते आजपर्यंतच्या काळात भुवनेश्वरकुमार, ईशांत शर्मा, मो. शमी, उमेश यादव, रोहित शर्मासारखे मोठे खेळाडू जखमी झाले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.