आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • Three Teams Vying For A Place In The Final Of The World Test Championship; Team India Needs 150 Points To Retain The Second Position

दिव्य मराठी अॅनालिसिस:वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनल प्रवेशसाठी तीन संघांत चुरस; दुसरे स्थ‌ान कायम ठेवण्यासाठी टीम इंडियाला 150 गुणांची आवश्यकता

मुंबई7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • भारताची ऑस्ट्रेलिया व इंग्लंडविरुद्ध मालिका, सध्या संघ तालिकेत दुसऱ्या स्थानी
  • ऑस्ट्रेलिया पहिल्या आणि न्यूझीलंड तिसऱ्या स्थानी

पहिल्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपची अंतिम लढत पुढील वर्षी जूनमध्ये लॉर्डसवर खेळवली जाणार आहे. नुकतीच न्यूझीलंडने वेस्ट इंडीज विरुद्ध कसोटी मालिका २-० ने जिंकून अंतिम फेरीच्या शर्यतीत दावेदारी ठोकली. संघ सध्या गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी आहे. ऑस्ट्रेलिया पहिल्या आणि भारत दुसऱ्या स्थानी आहे. भारताला आता २ मालिकेत एकूण ८ सामने खेळेल. ऑस्ट्रेलिया विरुद्ध चार सामन्यांच्या मालिकेला १७ डिसेंबर रोजी सुरुवात होत आहे. इंग्लंड विरुद्ध भारताला घरच्या मैदानावर ५ फेब्रुवारीपासून ४ सामन्यांची मालिका खेळायची आहे. दुसरीकडे, न्यूझीलंडला अखेरची कसाेटी मालिका पाकिस्तान विरुद्ध खेळणार आहे.

ऑस्ट्रेलियाने ३-१ ने विजय मिळवला तर मार्ग सोपा

ऑस्ट्रेलियाचे सरासरी गुण सध्या ८२.२२ आहेत. ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्ध ४ सामन्यांच्या मालिकेत ३-१ ने विजय मिळवला आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अखेरच्या मालिकेत १-१ ने बरोबरी राखली, तरी संघ अव्वल दोनमध्ये कायम राहील. मात्र, सर्वाधिक लक्ष न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान मालिकेवर असेल.

ऑस्ट्रेलियात कमीत कमी एक सामना जिंकावा लागेल

भारताचे सरासरी गुण ७५ आणि न्यूझीलंडचे ६२.५० गुण आहेत. जर, न्यूझीलंडने पाकिस्तान विरुद्ध मालिका २-० ने जिंकली, तर त्यांची सरासरी ७० टक्के होईल. अशात भारतीय संघाला ७० पेक्षा अधिक सरासरीसाठी १५० गुणांची आवश्यकता आहे. म्हणजे पाच सामने जिंकावे लागतील. भारताने ४ विजय आणि ३ कसोटी बरोबरीत राखल्या तरी १५० गुण मिळवू शकतो.

बातम्या आणखी आहेत...