आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

क्रिकेट:ब्रेकचा वापर चांगला केल्यास खेळाडूंच्या करिअरमध्ये तीन वर्षांची वाढ : राहुल द्रविड

मुंबईएका वर्षापूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
  • विश्रांतीनंतरही खेळाडूंना नाही पडणार स्कीलचा विसर

लाॅकडाऊनमुळे सर्वच खेळाडूंना आता माेठा ब्रेक मिळाला आहे. मात्र, याच विश्रांतीकडे जरा सकारात्मक नजरेने पाहण्याची गरज आहे. याच ब्रेकमुळे जगभरातील विविध इव्हेंट्सच्या खेळाडूंना शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या माेठा आराम लाभला आहे. आता या विश्रांतीचा चांगल्या प्रकारे उपयाेग केल्यास खेळाडूंच्या करिअरमध्ये निश्चितपणे दाेन ते तीन वर्षांची वाढ हाेऊ शकते, असा माैलिक सल्ला नॅशनल क्रिकेट अकादमीचे प्रमुख राहुल द्रविडने आपल्या तमाम खेळाडूंना दिला. खेळाडूंनीही नवीन प्लॅनही तयार करावे. जेणे करून कामगिरीला उंचावता येईल, असेही ताे म्हणाला.

काेराेनामुळे सध्या भारतामध्ये लाॅकडाऊन सुरू आहे. यादरम्यान द्रविडने आॅलिम्पिक चॅम्पियन नेमबाज अभिनव बिंद्रा आणि माजी बॅडमिंटनपटू प्रकाश पदुकाेन यांच्यासाेबत चर्चात्मक चॅटिंग केली. ब्रेकनंतर खेळ सुरू झाल्यानंतर खेळाडू माेठ्या उमेदीने आपली कामगिरी करताना दिसणार आहेत. या माेठ्या ब्रेेकनंतरही खेळाडू सध्या आपले स्कील विसरले नाहीत. मी क्रिकेटच्या बाबतीत हे बाेलत आहे. त्यामुळे हे सर्व खेळाडू पुन्हा मैदानावर अव्वल कामगिरी करण्यासाठी उत्सुक आहेत, असा विश्वास द्रविडने व्यक्त केला.

बातम्या आणखी आहेत...