आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

क्रिकेट:भारताकडून विश्वचषकाचे यजमानपद काढून घेऊ : आयसीसी; सरकारला सहा पत्रे लिहिली : मंडळ

दुबईएका वर्षापूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
  • आयसीसीच्या स्पर्धेदरम्यान करात सूटचा वाद : 2021 मध्ये होईल टी-20 विश्वचषक

आयसीसीने भारतात २०२१ मध्ये होणाऱ्या टी-२० विश्वचषकाचे यजमानपद काढून घेतले जाणार असल्याचे म्हटले. आयसीसी स्पर्धेदरम्यान करात सूट मिळण्यासाठी बीसीसीआयसोबत २०१६ पासून वाद सुरू आहे. १७ एप्रिलपर्यंत मंडळाला त्याबाबत आयसीसीला माहिती द्यावयाची होती. मात्र, २४ मार्चपासून लॉकडाऊन असल्याने ३० जूनपर्यंत वेळ मागितला होता. बीसीसीआयने सरकारला ६ पत्रे लिहून ही बाब कळवली. आयसीसीचे जोनाथन हॉलने पत्र लिहून म्हटले, ‘अनेक वर्षांपासून बीसीसीआयकडे हे प्रकरण सोडण्याची संधी होती. तुम्ही पाऊल उचलले नाही.’

विश्वचषकाची स्थगिती निश्चित; आज बैठक

आयसीसीची आज टेलीकॉन्फरन्सिंगद्वारे बैठक होत आहे. यात ऑस्ट्रेलियात ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या टी-२० विश्वचषकावर चर्चा होईल. स्पर्धेला २०२२ पर्यंत स्थगित केले जाऊ शकते. मात्र, त्यावर अखेरचा निर्णय जूनमध्ये होण्याची शक्यता आहे. आयसीसीच्या एका सदस्याने म्हटले की, ‘बैठकीत विश्वचषक स्थगित होण्याची शक्यता आहे. त्याची अधिकृत घोषणा होईल की नाही केवळ हा प्रश्न आहे.’ अशात विश्वचषक स्थगित केला गेल्यास ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये आयपीएलचे होऊ शकते.

आम्ही सतत सरकारशी चर्चा करत आहोत : मंडळ

बीसीसीआयने कराच्या प्रकारात गंभीर नाही अशा आयसीसीच्या प्रतिक्रियेला अमान्य केले. एका अधिकाऱ्याने म्हटले की, आम्ही आयसीसीला सरकारशी चर्चा केलेल्या पत्रासंबंधी माहिती दिली. लॉकडाऊनमुळे त्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे आम्ही वेळ मागितला. अध्यक्ष शशांक मनोहर यांचे बीसीसीआयसोबत चांगले वर्तन नाही. जुलैमध्ये त्यांना बाजूला केल्यानंतर सर्व चांगले होईल.’

आयसीसीला ७५० कोटी रुपयांचे नुकसान हाेईल

आयसीसी सर्व देशांत सरकारकडून सूट मिळते, मात्र भारतात असे होत नाही. भारतात २०१६ मध्ये झालेल्या टी-२० विश्वचषकादरम्यान आयसीसीला सूट देण्यात आली नव्हती. त्यामुळे आयसीसीला १५० ते २२५ कोटी रुपयांचे नुकसान झाले. आयसीसीने बीसीसीआयला देण्यात येणाऱ्या निधीतून तेवढी रक्कम राेखून धरली आहे. त्यानंतर हे प्रकरण समाधान समितीकडे सुरू आहे. भारतात २०२३ पर्यंत होणाऱ्या दोन आयसीसीच्या स्पर्धेदरम्यान करात सूट न मिळाल्यास आयसीसीला ७५० कोटींचे नुकसान होऊ शकते.

बातम्या आणखी आहेत...