आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आज भारत-न्यूझीलंड दुसरा वनडे:न्यूझीलंडविरुद्ध भारताला सलग आठव्या मालिका विजयाची संधी, रायपूरमध्ये सामना

रायपूर12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सलामीच्या विजयाने फाॅर्मात असलेला यजमान भारतीय संघ आता पाहुण्या न्यूझीलंडविरुद्धची मालिका आपल्या नावे करण्यासाठी उत्सुक आहे. यासाठी भारतीय संघाला माेठी संधी आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा वनडे सामना शनिवारी रंगणार आहे.

रायपूरच्या शहीद वीर नारायणसिंग इंटरनॅशनल स्टेडियमवर दुपारी १.३० वाजेपासून हे दाेन्ही संघ समाेरासमाेर असतील. भारताने विजयी सलामी देत तीन वनडे सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडी घेतली. आता रायपूरच्या मैदानावरील विजयाने भारताला घरच्या मैदानावरील सलग २४ वी मालिका आपल्या नावे करू शकेल. तसेच भारतीय संघ यातून न्यूझीलंडविरुद्ध सलग आठवा मालिका विजय साजरा करणार आहे. कारण, न्यूझीलंड टीमला भारत दाैऱ्यावर अद्यापही वनडे मालिका जिंकता आली नाही. यातून आता टीमवर मालिका पराभवाचे सावट आहे.

रायपूरचे स्टेडियम जगातील चाैथे सर्वात माेठे
रायपूरचे शहीद वीर नारायणसिंग स्टेडियम हे जगातील सर्वात माेठे चाैथे मानले जाते. ४९ हजार आसनक्षमता असलेले हे भारतातील सर्वात माेठे तिसरे स्टेडियम आहे. याच मैदानावर शनिवारी यजमान भारत आणि न्यूझीलंड संघ पहिल्यांदा वनडे सामना खेळणार आहेत. यातून भारतीय संघ आपल्या घरच्या मैदानावरील ५० व्या वनडे स्टेडियमवर पदार्पण करणार आहेत. यातून यजमान टीम इंडियाला या पदार्पणात मैदानावर विजयी पताका फडकवण्याची संधी आहे. याच मालिका विजयासाठी पाेषक अशी खेळपट्टी तयार करण्यात आली.

विकेट टेकर उमरान मलिकला मिळणार संधी
भारतीय संघाचा कर्णधार राेहित शर्मा आता दुसऱ्या वनडे सामन्यासाठी युवा गाेलंदाज उमरान मलिकला संधी देण्याच्या विचारात आहे. सलामीच्या सामन्यात भारतीय गाेलंदाजांची निराशाजनक कामगिरी ठरली. न्यूझीलंडच्या ६ बाद १३१ धावा असताना एकट्या ब्रेसवेलने तुफानी फटकेबाजी करत धावसंख्येचा आलेख वेगाने उंचावला हाेता. त्यामुळे आता भारतीय संघ गाेलंदाजीत बदल करण्याच्या तयारीत आहे.

बातम्या आणखी आहेत...