आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • Asia Cup India Vs Pakistan Playing 11; Fast Bowler Avesh Khan Ruled Out | Cricket News, Tomorrow's Match Against Pakistan, A Big Blow To Team India, Fast Bowler Avesh Khan Has Viral Fever, May Be Out Of Playing

पाक विरूद्ध उद्या सामना, टीम इंडियाला मोठा झटका:वेगवान गोलंदाज आवेश खानला व्हायरल फिव्हर, होऊ शकतो प्लेइंगच्या बाहेर

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भारत आणि पाकिस्तान मध्ये (रविवारी) 4 सप्टेंबरला होणाऱ्या सामन्यापूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज आवेश खानला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळण्याची शक्यता कमी आहे, त्याला कारण म्हणजे आवेशखानला व्हायरल फिव्हर असून तो दोन दिवसांपासून हॉटेलच्या खोलीतून बाहेरही पडला नाही.

BCCI च्या अधिकाऱ्याने दिव्य मराठीला सांगितले की तो खेळण्याच्या स्थितीत दिसत नाही. त्याच्यासोबत मेडिकल टीम उपचार करीत आहे. जर वेगवान गोलंदाज आवेशखान प्लेइंग 11 चा भाग नसेल तर भारतीय गोलंदाजीमध्ये मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.

आशिया कपमध्ये टीम इंडियाचा एकमेव असा गोलंदाज आहे जो 140 किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी करतो. त्याच्या अनुपस्थितीत कोणाला संधी मिळू शकते ते जाणून घेऊया…..

आवेश खानने पाकिस्तानविरुद्ध फखर जमानची विकेट घेतली होती
आवेश खानने पाकिस्तानविरुद्ध फखर जमानची विकेट घेतली होती

आवेशने पाकिस्तानविरुद्ध महत्त्वाची विकेट घेतली होती

ग्रुपमध्ये झालेल्या दोन्ही लढतींमध्ये आवेश खानची गोलंदाजी ही महागात पडली होती. असे असले तरीही त्याने पाक विरूद्धच्या सामन्यामध्ये अतिशय महत्वाची विकेट घेतली ते म्हणजे फखर जमानची. फखर हा उत्तम फलंदाज असून त्याने आतापर्यंत भारतापुढे अनेकदा तुफान फटकेबाजी केली आहे.

त्यामुळे त्याची विकेट मिळणे हे भारतासाठी फायदेशीर ठरली होती. आवेश हा अत्यंत महत्त्वाच्या प्रसंगी टीम इंडियाला विकेट मिळवून देतो त्यामुळे टीम व्यावस्थापनाचा त्यावर विश्वास दिसून येतो.

जडेजाही दुखापतीमुळे टीममधून आहे बाहेर

शुक्रवारी टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा गुडघ्याच्या दुखापतीमुळे आशिया कपमधून बाहेर पडला. त्याच्या जागी अक्षर पटेलचा संघात समावेश करण्यात आला आहे. जडेजा पाकिस्तान आणि हाँगकाँगविरुद्धच्या सामन्यात टीमचा भाग होता. त्याचवेळी अक्षर पटेल राखीव खेळाडू म्हणून UAE ला गेला होता.

आशिया कपमध्ये जसप्रीत बुमराह आणि हर्षल पटेल यांच्या दुखापतीनंतर संघ व्यवस्थापनाने आवेशवर विश्वास दाखवला होता.
आशिया कपमध्ये जसप्रीत बुमराह आणि हर्षल पटेल यांच्या दुखापतीनंतर संघ व्यवस्थापनाने आवेशवर विश्वास दाखवला होता.

टीम इंडियाची समुद्र किनाऱ्यावर धमाल-मस्ती

शुक्रवारी BCCI ने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये आवेश खान विराट कोहलीसोबत व्हॉलीबॉल खेळताना दिसत आहे. जसप्रीत बुमराह आणि हर्षल पटेल जखमी झाल्यानंतर, अर्शदीप सिंग आणि आवेश खान यांची भुवनेश्वर कुमारचा जोडीदार म्हणून भारतीय संघात निवड करण्यात आली होती. आशिया कपमध्ये आतापर्यंत भुवीला सोडून एकाही वेगवान गोलंदाजाला प्रभाव पाडता आलेला नाही.

आवेश खानने भारताकडून आतापर्यंत 15 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 13 विकेट घेतल्या आहेत.

आशिया कपमध्ये फखर जमानची विकेट घेतल्यानंतर टीम इंडियाचे खेळाडू जल्लोष करताना.
आशिया कपमध्ये फखर जमानची विकेट घेतल्यानंतर टीम इंडियाचे खेळाडू जल्लोष करताना.

आवेशच्या अनुपस्थितीत कोणाला मिळेल संधी

आवेश प्लेइंग इलेव्हन मधून बाहेर पडला तर त्याच्या जागी दीपक चहर हा प्लेइंग इलेव्हनचा भाग असू शकतो. दीपक राखीव खेळाडू म्हणून UAE ला गेला आहे. दीपक टीमचा भाग असेल तर भारताची फलंदाजीही मजबूत होण्यास मदत होईल. विशेष म्हणजे दीपक शेवटच्या षटकामध्ये चांगले फटके मारू शकतो.

बातम्या आणखी आहेत...