आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • Top 5 Moments Of Asia Cup Final: Nosebleed After Collision With Shadab Asif, Madhushanka Gives 9 Runs In One Ball

आशिया चषकाच्या अंतिम सामन्यातील टॉप 5 क्षण:मधुशंकाने एकाच चेंडूत दिल्या 9 धावा, आसिफशी धडकल्यावर शादाबच्या नाकातून आले रक्त

18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आशिया कप 2022 मध्ये अफगाणिस्तानकडून पहिला सामना गमावल्यानंतर, श्रीलंकेच्या टीमने स्पर्धेत जोरदार वापसी करत चॅम्पियन ट्रॉफी पटकावली. श्रीलंकेसमोर ट्रॉफी जिंकण्याच्या मार्गावर आलेल्या प्रत्येक टीमला पराभवाला सामोरे जावे लागले.अखेर शेवटी, रविवारी श्रीलंकेचा पाकिस्तानशी सामना झाला आणि या बलाढ्य टीमचाही श्रीलंकेकडून 23 धावांनी पराभव झाला.

रविवारी खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात पाकिस्तान आणि श्रीलंका या दोन्ही टीमने आपल्यातील बेस्ट देण्याचा प्रयत्न केला. सामन्यादरम्यान काही क्षण असे होते जे अविस्मरणीय ठरले. चला जाणून घेऊ या अशाच 5 अविस्मरणीय क्षणांबद्दल ...

सामन्याच्या पहिल्याच षटकात नसीमने मेंडिसला केले बोल्ड

नसीम शाहने पहिल्याच षटकातच पाकिस्तानची विकेट घेतली. कुशल मेंडिस स्वस्तात बाद झाला.
नसीम शाहने पहिल्याच षटकातच पाकिस्तानची विकेट घेतली. कुशल मेंडिस स्वस्तात बाद झाला.

आशिया कप अंतिम फेरीतला पहिला षटक. गोलंदाज नसीम शाह आणि फलंदाज कुशल मेंडिस. दोन्ही खेळाडूंवर आपल्या संघाला चांगली सुरुवात करून देण्याचे दडपण होते. या दबावामुळे नसीमने सामन्यातील पहिला चेंडू वाईड टाकला.

यानंतर त्याने स्वत:ला सांभाळले आणि सामन्याच्या तिसऱ्या चेंडूवर त्याने 142 किमी वेगाने इनस्विंगर टाकला. उजव्या हाताचा फलंदाज असलेल्या कुशल मेंडिसच्या बॅट आणि पॅडमधून चेंडू निघून तो स्टंम्पला लागला आणि तो क्लीन बोल्ड झाला. या विकेटसह नसीमने पाकिस्तानला सामन्यात चांगली सुरुवात करून दिली.

कुशल मेंडिसला नसीम साहचा चेंडू समजू शकला नाही आणि पहिल्याच चेंडूवर तो बाद झाला.
कुशल मेंडिसला नसीम साहचा चेंडू समजू शकला नाही आणि पहिल्याच चेंडूवर तो बाद झाला.

शादाबने जबरदस्तीने पंचांना श्रीलंकेच्या फलंदाजाला आऊट देण्यास सांगितले

शादाब खान आणि पंच मसूदुर रहमान यांच्यातील मजेदार क्षण. शादाब खानने त्यांना जबरदस्तीने आउट देण्यास सांगितले.
शादाब खान आणि पंच मसूदुर रहमान यांच्यातील मजेदार क्षण. शादाब खानने त्यांना जबरदस्तीने आउट देण्यास सांगितले.

पॉवर-प्लेमध्ये श्रीलंकेचे एकामागून एक विकेट पडत होते, त्याच दरम्यान सामन्यात एक मजेदार घटना घडली. शादाब खानने अंपायरचा हात पकडून फलंदाजाला आउट करण्यासाठी त्यांचा हात वर करण्यास जबरदस्ती केली. खरं तर सामन्याच्या सहाव्या षटकात हारिस राउफने भानुका राजपक्षेला शानदार यॉर्कर टाकला होता. ज्यावर पाकिस्तानी खेळाडूंनी LBW साठी जोरदार अपील केले, पण अंपायरने त्याला नाबाद घोषित केले.

यावर पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझमने DRS घेतला. तिसऱ्या पंचानेही फलंदाजाला नाबाद घोषित केले, पण शादाब खान विकेटसाठी इतका उत्सुक होता की त्याने जबरदस्तीने अंपायरकडे विकेटची मागणी केली आणि त्यांचा हात वर उचलण्यास जबरदस्ती केली.

शादाब खानने भानुकाचा झेल सोडला आणि तो जखमी झाला

आसिफ अली आणि शादाब खान एकमेकांना भिडले. यामुळे सामना 10 ते 15 मिनिटे रखडला होता.
आसिफ अली आणि शादाब खान एकमेकांना भिडले. यामुळे सामना 10 ते 15 मिनिटे रखडला होता.

श्रीलंकेचा डावाच्या 19 व्या षटकाचा शेवटचा चेंडू होता. भानुका राजपक्षे यांच्या विरोधात गोलंदाजीला हारिस राउफ होता. श्रीलंकेची स्कोअर वाढवण्यासाठी भआनुका प्रयत्नशील होता. त्यामुळे त्याने हारिसच्या चेंडूला मिड-विकेटच्या दिशेने षटकार मारण्याचा प्रयत्न केला. चेंडू बाउंड्रीच्या अगदीजवळ आसिफ अलीच्या हातात चेंडू जवळपास आलाच होता. तेवढ्यात शादाब खानने दुसऱ्या बाजूने कॅच घेण्यासाठी डायव्ह मारला, त्यात तो आसिफला जोरदार धडकला. त्यात आसिफच्या हातात आलेला बॉल सुटला आणि तो बाउंड्रीपार गेला.

या दोघांच्या टक्करमध्ये मात्र राजपक्षे आउट होता होता बचावला. उलट बॉल सीमेपार गेल्यामुळे राजपक्षेच्या खात्यात सिक्सरही जमा झाले ते वेगळे. शादाबची आसिफला धडक इतकी जोरदार होती की शादाबच्याच नाकातून रक्त येऊ लागले. यामुळे 10 ते 15 मिनिटे खेळ थांबवावा लागला.

हा झेल पाकिस्तानसाठी खूप महागडा ठरला. यावेळी राजपक्षे 57 धावांवर खेळत होता. यानंतर अखेरच्या षटकात त्याने 14 धावा काढल्या, त्यामुळे श्रीलंकेची धावसंख्या 170 वर पोहोचली.

मदुशंकाने 11 चेंडूंचे एक ओव्हर टाकले

कुशल मेंडिस आणि कर्णधार शनाका दबावाखाली असलेल्या गोलंदाज मधुशंकाला समजावताना.
कुशल मेंडिस आणि कर्णधार शनाका दबावाखाली असलेल्या गोलंदाज मधुशंकाला समजावताना.

आशिया चषक 2022 जिंकण्यासाठी पाकिस्तानला 171 धावांची गरज होती. दिलशान मदुशंका पहिले षटक टाकायला आला पण त्याला या सामन्यात असलेले दडपण सहन करता आले नाही आणि त्याने नो बॉल आणि एकानंतर एक असे वाइड्स टाकायला सुरूवात केली. असे त्याने एका ओव्हर मध्ये 11 चेंडू टाकले.

0.1 मधुशंकाने बॅक ऑफ लेन्थ बॉल टाकले त्यावेळी गोलंदाजी करताना त्याचा पाय क्रीजच्या बाहेर गेला आणि अंपायरने अंपायरने नो बॉल दिला.

0.1 : त्यानंतर दुसर्‍यांदा सामन्याचा पहिला चेंडू टाकण्यास तयार असताना मधुशंकाने शॉर्ट बॉलचा वापर केला. लेग साइडला असल्याने अंपायरने तो बॉल वाइड बॉल दिला.

0.1: रिझवान पुन्हा एकदा सामन्याचा पहिला चेंडू खेळण्यासाठी सज्ज झाला. त्यावेळी परत तिसरा चेंडू मधुशंकाने पुन्हा एकदा लेग साइडवर वाइड टाकला.

0.1: मधुशंकाने चौथा चेंडू मात्र ओव्हरचा पहिला चेंडू लेग साईडवर आणखी एक वाइड टाकला, विकेटकीपरला तो चेंडू अडवता आला नाही त्यामुळे तो वाइड सोबतच चौकारही गेला

0.1: आत्तापर्यंत सामन्यात एकही चेंडू न खेळता पाकिस्तानची धावसंख्या 8 इतकी झाली. मधुशंकाने यावेळीही लेग साइडकडे वाइड चेंडू टाकला. मग मात्र दबावाखाली असलेल्या मधुशंकाला विकेटकीपर मेंडिस आणि कर्णधार सनाका यांनी समजावले. त्यानंतर त्याने पहिला चांगला चेंडू टाकला. तोपर्यंत पाकिस्तानने एका चेंडूत 10 धावा केल्या होत्या.

प्रमोद मधुशनची शानदार गोलंदाजी

प्रमोद मधुशनने लागोपाठ दोन चेंडूत दोन बळी घेत पाकिस्तानचे कंबरडे मोडले.
प्रमोद मधुशनने लागोपाठ दोन चेंडूत दोन बळी घेत पाकिस्तानचे कंबरडे मोडले.

प्रमोद मधुशनची शानदार गोलंदाजी

पाकिस्तानच्या डावातील चौथे षटक टाकण्यासाठी प्रमोद मधुशन आला. पहिल्याच षटकातच 4 वाइड्स बॉल गेल्याने श्रीलंकेची सुरुवात काही चांगली झाली नाही. प्रमोदच्या समोर कर्णधार बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान होते, मधुशनने बाबरला लेग स्टंपवर बॉल टाकला ज्याला बाबरने फ्लिक केले आणि फाइन शॉर्ट लेगवर उभा असलेल्या मधुशंकाने त्याचा सोपा कॅच घेतला.

पुढच्याच चेंडूवर फखर जमान कव्हर ड्राइव्ह करताना बोल्ड झाला. फखरने पहिला चेंडू ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न केला मात्र चेंडू त्याच्या बॅटच्या कडेला लागून आतल्या बाजूस विकेटवर आदळला.अशाप्रकारे सलग दोन चेंडूंत दोन विकेट घेत मधुशनने पाकिस्तानला सुरुवातीला मोठे धक्के दिले.या रोमहर्षक झालेल्या लढतीत मधुशनने संपूर्ण सामन्यात 4 विकेट घेतल्या.

बातम्या आणखी आहेत...