आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टी-20 वर्ल्डकप:पाकिस्तानची वाट खडतर,  पाक संघ डीएल नियमाने विजयी; आफ्रिकेवर 33 धावांनी मात

सिडनी23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आगामी सामन्यातील विजयाने भारतीय संघाचे आठ आणि दक्षिण आफ्रिका संघाचे ७ गुण हाेतील. त्यामुळे पुढच्या सामन्यात विजय संपादन केल्यानंतरही पाकिस्तानला पॅकअप करावे लागेल.

सामनावीर शादाब खानच्या (५२ धावा, २/१६) अष्टपैलू खेळीच्या बळावर पाकिस्तान संघाने गुुरुवारी टी-२० विश्वचषकात विजय संपादन केला. बाबर आझमच्या नेतृत्वाखाली पाकिस्तान संघाने ब गटातील आपल्या चाैथ्या सामन्यात बावुमाच्या दक्षिण आफ्रिकेवर मात केली. पाकिस्तान संघाने डकवर्थ लुईस नियमानुसार ३३ धावांनी सामना जिंकला. नाणेफेक जिंकून पाकिस्तान संघाने प्रथम फलंदाजी करताना ९ बाद १८५ धावा काढल्या हाेत्या. आफ्रिकेला डीएलनुसार १४ षटकांत १४२ धावांचे टार्गेट देण्यात आले. मात्र, संघाला ९ गड्यांच्या माेबदल्यात १०८ धावांपर्यंत मजल मारता आली. यासह पाकला ब गटात आपला दुसरा विजय साजरा करता आला. मात्र, विजयानंतरही पाकिस्तान संघाची उपांत्य फेरीची वाट खडतर मानली जात आहे. कारण पाक सध्या चार सामन्यांत दाेन विजय, दाेन पराभवांसह चार गुणांसह गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. भारतीय संघ चार सामन्यांत चार सामन्यांमध्ये तीन विजय, एका पराभवाने सर्वाधिक ६ गुणांसह अव्वलस्थानी आहे. त्यापाठाेपाठ दक्षिण आफ्रिका संघाने चार सामन्यांत दाेन विजय, एका पराभवाने ५ गुणांसह दुसरे स्थान राखून ठेवले आहे. आता भारत आणि दक्षिण आफ्रिका संघाच्या आगामी सामन्यातील विजयाने पाकच्या उपांत्य फेरीतील प्रवेशाच्या आशा मावळणार आहेत. यामुळे आगामी सामन्यातील विजयाचा पाकला काेणताही फायदा हाेणार नाही.

बातम्या आणखी आहेत...