आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रिकेट:प्रशिक्षणात सचिन, रोहितला वेट ट्रेनिंग करताना पाहिले नाही! ट्रेनर रामजी यांचे मत 

मुंबई3 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • 2011 वर्ल्डकप व 2013 चॅम्पियन ट्रॉफीदरम्यान ते भारतीय संघाचे ट्रेनर होते

भारतीय संघाने जेव्हा २०१३ मध्ये चॅम्पियन ट्रॉफी जिंकली होती, तेव्हा रामजी श्रीनिवासनने धोनीच्या संघाला ट्रेनिंग दिले होते. रामजी म्हणतात की, कोरोना व्हायरसमुळे सर्व काही बंद आहे. मात्र, यादरम्यान स्वत:ला तंदुरुस्त ठेवणे कठीण नाही. कोणालाही तंदुरुस्त राहण्यासाठी थांबवण्याची गरज नाही. रामजी आश्चर्चचकित आहे, की आता तंदुरुस्त राहण्याची सर्व पद्धतच बदलली. २०११ वनडे विश्वचषकादरम्यान राजमीने भारतीय संघाला तयार केले होते. त्यांनी म्हटले की, तुम्ही घरीच फिटनेस चांगला ठेवू शकतात. फक्त स्वत:च्या शरीराला अोळखण्याची गरज आहे. मला सध्या वेट ट्रेनिंगची गरज नाही. ते काही खेळाडूंसाठी आवश्यक आहे. मी भारतीय संघासोबत राहिलाे आहे. मी कधीही सचिन तेंडुलकर, धाेनी, सेहवाग किंवा रोहित शर्माला वेट ट्रेनिंग करताना पाहिले नाही. सचिन मनगट व खांद्यावर खूप मेहनत घेत होता. धोनीला वेगळे ठेवले पाहिजे, कारण तो स्वाभाविक व्यक्ती आहे. सेहवान हुशार होता. त्याला माहिती होते, काय आवश्यक आहे. त्याने खूप मदतगार ठरणारे व्यायाम केले. रोहितने देखील असेच केले. त्यांनी म्हटले की, “मी युवराजला देखील खूप वजन उचलताना पाहिले नाही. आपण नेहमी विसरतो की, एखादी गोष्ट कोणासाठी योग्य असेल ती, गोष्ट इतरालाही लागू असते, असे नाही. जहीरला शरीरातील प्रत्येक मांसपेशी माहिती आहे.

बातम्या आणखी आहेत...