आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायश धुलच्या नेतृत्वात भारताचा युवा संघ आता विक्रमी पाचव्यांदा विश्वविजेता हाेण्याच्या इराद्याने अॅटिंगाच्या सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियमच्या मैदानावर उतरणार आहे. चार वेळचा विश्वविजेता भारत आणि इंग्लंड यांच्यात शनिवारी १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेची फायनल हाेणार आहे. भारताने आठव्यांदा फायनल गाठली आहे. तसेच इंग्लंड टीमला २४ वर्षांनंतर युवा वर्ल्डकपच्या अंतिम फेरीचा पल्ला गाठता आला. आयसीसीच्या १९ वर्षांखालील विश्वचषकातून भारतीय संघाला अनेक सुपरस्टार युवा खेळाडू मिळाले. त्यामुळे या वयाेगटातील हे स्टार खेळाडू आता आंतरराष्ट्रीय स्तरावर टीम इंडियासाठी गेम चेंजरची भूमिका यशस्वीपणे बजावताना दिसतात. याच स्पर्धेतून माजी कसाेटीपटू राहुल द्रविडपासून आताचा सलामीवीर पृथ्वी शाॅसारख्या खेळाडूंचा समावेश आहे.
कानिटकर, लक्ष्मणची मेहनत
भारताने सलगच्या विजयाची माेहीम कायम ठेवताना विश्वचषकाची अंतिम फेरी गाठली. यासाठी मुख्य प्रशिक्षक ऋषिकेश कानिटकर, गाेलंदाजी काेच साइराज बहुतले, क्षेत्ररक्षण काेच मुनीष बाली व एनसीए इनपुट हेड व्हीव्हीएस लक्ष्मण यांचे माेलाचे याेगदान राहिले.
युवा सुपरस्टार; दुहेरी भूमिकेची प्रचंड क्षमता :
भारतीय संघात अनेक युवा सुपरस्टार खेळाडू आहेत. यांच्यात संघाच्या विजयासाठी दुहेरी भूमिका बजावण्याची प्रचंड क्षमता आहे. म्हणजेच प्रत्येक खेळाडू हा फलंदाजीसह गाेलंदाजीतही अधिक तरबेज असल्याचे दिसून येते. त्यामुळे आपल्या टीमला जेतेपद मिळवून देण्यासाठी सर्वच खेळाडू उत्सुक आहेत.
चॅम्पियन संघाचे कर्णधार
मोहमंद कैफ (2000)-चॅम्पियन
रविकांत (2006)- उपविजेता
विराट कोहली (2008)- चॅम्पियन
उन्मुक्त चंद (2012)- चॅम्पियन
इशान किशन (2016)- उपविजेता
पृथ्वी शॉ (2018)- चॅम्पियन
प्रियम गर्ग (2020)- उपविजेता
यश (2022)-आज निश्चित हाेणार
- हा सामना जिंकल्यासह भारतीय संघ पाचव्यांदा विश्वविजेता ठरेल. संघाला हे जेतेपद मिळवून देणारा यश हा दिल्लीचा तिसरा युवा कर्णधार ठरेल. यापूर्वी विराट काेहली (२००८) आणि उन्मुक्त चंद (२०१२) यांनी हे यश संपादन केले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.