- Marathi News
- Sports
- Cricket
- Under 19 Team India | India Vs England; U19 World Cup 2022 | Final Updates In Latest Pictures | One sided Catch By Kaushal Tambe, Bowling And Batting By Raj Bawa | Marathi News
PHOTOS पाहा यंगिस्तानचा विजय:कौशल तांबेने घेतलेला एकहाती कॅच, राज बावाने गोलंदाजी आणि फलंदाजीत केली फटकेबाजी
अंडर-19 विश्वचषकाच्या फायनलमध्ये इंग्लंडला हरवून टीम इंडियाने इतिहास रचला आहे. भारतीय संघाने अंतिम फेरीत इंग्लंडचे 4 गडी राखून पराभव केला आणि पाचव्यांदा या स्पर्धेवर कब्जा केला. या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत 189 धावा काढल्या. लक्षाचा पाठलाग करत भारताकडून जेम्स रेव्ह (95) यांनी सर्वाधिक धावा केल्या, तर राज बावाने 5 बळी घेत शानदार कामगिरी केली. रवी कुमारनेही 4 बळी घेतले.
टीम इंडियासमोर विश्वचषक जिंकण्यासाठी 190 धावांचे लक्ष्य होते, जे संघाने 47.6 षटकांत 6 गडी गमावून अतिशय रोमांचकारी पद्धतीने पूर्ण केले. विजयात निशांत सिंधूने 54 चेंडूत नाबाद 50 धावांची खेळी केली तर उपकर्णधार शेख रशीदनेही 50 धावांची शानदार खेळी केली.
पाहा अंतिम सामन्याचे अविस्मरणीय क्षण...
अंतिम फेरीत इंग्लंडचा कर्णधार टॉम पर्स्ट शून्यावर क्लीन बोल्ड झाल्यानंतर रवी कुमार.
रवी कुमारने पहिल्या 5 षटकात 20 धावा देत 2 बळी घेतले. त्याने टॉम पर्स्ट (0) आणि जेकब बेथेल (2) यांना बाद केले.
राज बावाने विल्यम लक्सटन (4) आणि जॉर्ज बेल (0) यांना सलग 2 चेंडूत बाद केले. दोघांना यष्टीरक्षक दिनेश बानाने झेलबाद केले. बावा हॅट्ट्रिक घेण्याच्या अगदी जवळ होता, मात्र तसे करू शकला नाही.
फायनलमध्ये इंग्लंडकडून जेम्स रेव्हने 116 चेंडूत 95 धावांची सर्वोच्च खेळी खेळली.
कौशल तांबेने एका हाताने जेम्स रेव्हचा अप्रतिम झेल घेतला.
राज बावाने अंतिम फेरीत अप्रतिम गोलंदाजी करत अवघ्या 31 धावांत 5 बळी घेतले.
लेगस्पिनर विकी ओस्तवालने संपूर्ण स्पर्धेत भारताकडून सर्वाधिक 12 बळी घेतले.
उपकर्णधार शेख रशीदने अंतिम सामन्यात 84 चेंडूत 50 धावा केल्या. या स्पर्धेत त्याने चार डावात 50.25 च्या सरासरीने 201 धावा केल्या.
यष्टिरक्षक दिनेश बाणाने षटकार ठोकत टीम इंडियाला विजय मिळवून दिला.
अंतिम सामना जिंकल्यानंतर निशांत सिंधू आणि दिनेश बाना.
वर्ल्ड कप जिंकल्यानंतर टीम इंडियाचे खेळाडू.
भारतीय संघाने पाचव्यांदा अंडर-19 विश्वचषक जिंकला.
टीम इंडियाचा कर्णधार यश धुल. यशपूर्वी, भारताने मोहम्मद कैफ, विराट कोहली, उन्मुक्त चंद आणि पृथ्वी शॉ यांच्या नेतृत्वाखाली अंडर-19 विश्वचषक जिंकला होता.
अंतिम फेरीत राज बावा सामनावीर ठरला. 5 विकेट घेण्यासोबतच त्याने 35 धावांची सुरेख खेळीही खेळली.
निशांत सिंधूने अंतिम सामन्यात 54 चेंडूत नाबाद 50 धावांची शानदार खेळी केली.
विश्वचषक ट्रॉफीसह यश धुल आणि सहकारी