आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहिलांच्या १९ वर्षांखालील विश्वचषकात बुधवारी भारताने सलग तिसरा विजय मिळवला. भारताने स्कॉटलंडला ८३ धावांनी मात देत ब गटात अव्वल स्थान राखले. भारताने प्रथम खेळताना ४ बाद १४९ धावा उभारल्या. तृषाने (५७) अर्धशतक केले. प्रत्युत्तरात स्कॉटलंडचा डाव ६६ धावांवर ढेपाळला. मन्नतने ४ बळी घेतले. अ गटात ऑस्ट्रेलिया व बांगलादेशने आपापले सामने जिंकले. ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेला १०८ धावांनी मात दिली. प्रथम खेळताना आॅस्ट्रेलियाने ५ बाद १५९ धावा उभारल्या. एला हेवार्डने सर्वाधिक ३६ धावा केल्या. प्रत्युत्तरात श्रीलंकेचा डाव १३ षटकांत ५१ धावांवर संपुष्टात आला. त्याचबरोबर, बांगलादेशने अमेरिकेला ५ गड्यांनी पराभूत केले. प्रथम फलंदाजी करताना अमेरिका संघाने ४ बाद १०३ धावा काढल्या. प्रत्युत्तरात बांगलादेश संघाने १८ षटकांत ५ गडी गमावत विजय साकारला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.