आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • Unforgettable Moments From India Afghanistan Match: King Kohli Faces Critics Shut Down, Afghans Desperate Against Bhuvi's Deadly Swing

भारत-अफगाण सामन्याचे अविस्मरणीय क्षण:किंग कोहलीने टीकाकारांचे तोंड केले बंद, भुवीच्या घातक स्विंगसमोर हतबल अफगाण

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आशिया चषकाच्या सुरुवातीला भारताला ट्रॉफी विजेत्याचा सर्वात मोठा दावेदार मानले जात होते. भारताने ग्रुप स्टेजमध्ये पाकिस्तान आणि हाँगकाँगवर मोठा विजय मिळवून हे जवळपास सिद्धही केले होते. पण, टीम इंडियाला सुपर 4 सामन्यांच्या लढतीत आपला फॉर्म कायम ठेवता आला नाही. सुपर-4 च्या लढतीत पाकिस्तान आणि श्रीलंकेकडून पराभूत झाल्यानंतर भारत अंतिम फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडला.

विराट आणि भुवनेश्वरने त्यांचा गमावलेला फॉर्म परत मिळवला.
विराट आणि भुवनेश्वरने त्यांचा गमावलेला फॉर्म परत मिळवला.

अशा स्थितीत भारताला गुरुवारी अफगाणिस्तानविरुद्ध साखळी सामन्यातील उर्वरीत सामना खेळावा लागणार होता. त्यामुळे या सामन्याला तितकेसे महत्व असणार नव्हते. तसेच हा सामना नीरस होईल आणि त्यामुळे प्रेक्षकांना कोणताही थरार बघायला मिळणार नाही, असा ठाम विश्वास होता.

मात्र, विराट कोहली आणि भुवनेश्वर कुमार यांच्या दमदार कामगिरीने आणि खेळाच्या तिन्ही विभागात अफगाणिस्तान चारोमुंड्या चीत अशी परिस्थिती होती. त्यामुळे या सामन्यातील काही क्षण असे आहेत जे विसरणे सोपे नाही. अशाच चार अविस्मरणीय क्षणांना पुन्हा एकदा अनुभवूया...

अफगाणिस्तानची खराब फिल्डिंग

अफगाणिस्तानने सामन्यात 3 झेल सोडले. विराट कोहलीला 34 धावांवर जीवदान मिळाले.
अफगाणिस्तानने सामन्यात 3 झेल सोडले. विराट कोहलीला 34 धावांवर जीवदान मिळाले.

अफगाणिस्तानच्या खेळाडूंनी या सामन्यात अतिशय ढिसाळ फिल्डिंग केल्याचे दिसले.अफगाण खेळाडूंनी तीन वेळा भारतीय फलंदाजांचे कॅच सोडले. यात फिल्डर्सनी दोनदा पंतचा झेल सोडला तर एकदा विराटला जीवदान दिले.

आठव्या षटकात पहिला झेल सोडला. अफगाणिस्तानचा कर्णधार मोहम्मद नबी गोलंदाजी करत होता. ओव्हरच्या तिसऱ्या चेंडूवर विराटने डीप मिडविकेटवर एरियल शॉट खेळला. तिथे इब्राहिम फिल्डिंग करत होता. चेंडू त्याच्या दोन हातांमधून सुटला आणि तो सीमारेषे बाहेर गेला.

हा झेल सुटला तेव्हा कोहली 34 धावांवर खेळत होता. यानंतर अफगाणिस्तानच्या खेळाडूंनी पंतचा दोनदा झेल सोडला. पंतचा पहिला झेल 17व्या षटकात आणि दुसरा झेल 20व्या षटकात सोडला गेला.

विराटचा शतकाचा दुष्काळ संपला

अफगाणिस्तानविरुद्ध विराट कोहलीने 122 धावा केल्या होत्या. 1020 दिवसांनंतर शतक
अफगाणिस्तानविरुद्ध विराट कोहलीने 122 धावा केल्या होत्या. 1020 दिवसांनंतर शतक

या सामन्यात विराट कोहली सलामीला उतरला होता. सलामीच्या संधीचा चांगला फायदा घेत विराटने 1020 दिवसांनंतर इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये शतक झळकावले. त्याच्या कारकिर्दीतील हे एकूण 71 वे आणि इंटरनॅशनल टी-20 मधील पहिले शतक आहे. विराटने शानदार षटकार ठोकत आपले शतक पूर्ण केले.

यानंतर, त्याने त्याच्या गळ्यात घातलेल्या त्याच्या एंगेजमेंट रिंगचे चुंबन घेतले आणि शतक पत्नी अनुष्का शर्मा आणि मुलगी वामिकाला समर्पित केले. या संपूर्ण डावात विराटने एकूण 6 षटकार आणि 12 चौकार लगावले.

भुवीची घातक गोलंदाजी, पहिल्या दोन षटकांत घेतल्या चार विकेट्स

भुवनेश्वर कुमारने 4 ओव्हरमध्ये 5 विकेट घेतल्या. पहिल्याच षटकात दोन्ही सलामीवीरांना फटका बसला.
भुवनेश्वर कुमारने 4 ओव्हरमध्ये 5 विकेट घेतल्या. पहिल्याच षटकात दोन्ही सलामीवीरांना फटका बसला.

विराट कोहलीच्या धडाकेबाज शतकानंतर भारतीय गोलंदाजांना आता आपली खेळी दाखविण्याची वेळ होती. त्यात पहिल्याच षटकातच भुवनेश्वर कुमारने अफगाणिस्तानच्या दोन फलंदाजांना तंबूत पाठवले. त्यानंतर त्याने आणखी तीन विकेट घेतल्या. या सामन्यात भुवीने घातक गोलंदाजी करत अवघ्या 4 धावांत 5 विकेट घेतल्या.

भारताला मिळाला नवा गोलंदाज

दिनेश कार्तिकने आपल्या 50 व्या सामन्यात गोलंदाजी केली. एका षटकात 18 धावा.
दिनेश कार्तिकने आपल्या 50 व्या सामन्यात गोलंदाजी केली. एका षटकात 18 धावा.

हा सामना भारतासाठी आश्चर्याने भरलेला होता. असाच एक आश्चर्य पाहायला मिळाला तो म्हणजे सामन्याच्या शेवटच्या षटकात दिनेश कार्तिक गोलंदाजी करण्यासाठी आला.

कार्तिकला विकेटकीपर म्हणून आपण नेहमी पाहिले पण या सामन्यात त्याला गोलंदाजी करताना पाहून सर्व चाहते आश्चर्यचकित झाले. या षटकात कार्तिकने 18 धावा दिल्या. 15 वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत तो पहिल्यांदाच गोलंदाजीसाठी आला होता.

बातम्या आणखी आहेत...