आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कसोटी मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलियन संघ अडचणीत:उस्मान ख्वाजाला मिळाला नाही भारताचा व्हिसा

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मान ख्वाजा हा मूळचा पाकिस्तानचा आहे. - Divya Marathi
उस्मान ख्वाजा हा मूळचा पाकिस्तानचा आहे.

भारतासोबतच्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलिया संघाला मोठा धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलियाचा फलंदाज उस्मान ख्वाजाला भारताचा व्हिसा मिळू शकलेला नाही. अशा परिस्थितीत तो मंगळवारी संघासह भारतासाठी रवाना होऊ शकलेला नाही. तो गुरुवारी भारतासाठी निघेल. ऑस्ट्रेलियन फलंदाजाने स्वत: इंस्टाग्रामवर एक मीम पोस्ट केला असून, तो भारताच्या व्हिसाची वाट पाहत असल्याचे लिहिले आहे.

kkk

उस्मान पदक समारंभाला उपस्थित पण संघासोबत आला नाही

उस्मान ख्वाजा वगळता ऑस्ट्रेलियन संघ एलन बॉर्डर पदक समारंभात सहभागी झाल्यानंतर मंगळवारी रात्री सिडनीहून भारताकडे रवाना झाला. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने वाइड वर्ल्ड ऑफ स्पोर्ट्सला सांगितले की ख्वाजाचा व्हिसा मंजूर होणे अपेक्षित आहे आणि तो गुरुवारी भारतात जाईल.

उस्मान वगळता ऑस्ट्रेलियन संघ मंगळवारी भारताला रवाना झाला
उस्मान वगळता ऑस्ट्रेलियन संघ मंगळवारी भारताला रवाना झाला

पाकिस्तान मध्ये झाला जन्म

उस्मान ख्वाजा (36) याचा जन्म इस्लामाबाद, पाकिस्तान येथे झाला. तो ऑस्ट्रेलियाला शिफ्ट झाला होता आणि तिथे तो न्यू साउथ वेल्ससाठी क्रिकेट खेळू लागला.

उस्मान ख्वाजाने ऑस्ट्रेलियाकडून खेळले आहेत 56 कसोटी सामने

उस्मान ख्वाजाची कामगिरी काही काळापासून प्रभावी आणि सातत्याने उंचावत आहे.त्याने ऑस्ट्रेलियासाठी 56 कसोटी सामन्यांमध्ये 13 शतकांसह 4162 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर त्याने 40 वनडे सामन्यांमध्ये 1554 धावा आणि 9 टी-20 सामन्यांमध्ये 241 धावा केल्या आहेत.

पहिल्या 2 कसोटींसाठी भारतीय संघ: रोहित शर्मा (क), केएल राहुल (वीसी), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट, सूर्यकुमार यादव

भारत दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलियाचा कसोटी संघ: पॅट कमिन्स (क), अॅश्टन आगर, स्कॉट बोलँड, अॅलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, पीटर हँड्सकॉम्ब, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लायन, लान्स मॉरिस, टॉड मर्फी, मॅथ्यू रेनशॉ, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, मिचेल स्वेपसन, डेव्हिड वॉर्नर

बातम्या आणखी आहेत...