आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विजय हजारे ट्राॅफी:मुंबई संघ चाैथ्यांदा चॅम्पियन, फायनलमध्ये उत्तर प्रदेशवर सहा गड्यांनी मात

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • नेतृत्वात युवा वर्ल्डकपसह विजय हजारे ट्राॅफी जिंकून देणारा पृथ्वी शाॅ पहिला

सामनावीर आदित्य तारे (११८) आणि पृथ्वी शाॅच्या (७३) स्फाेटक झंझावाती खेळीच्या बळावर मुंबई संघाने रविवारी विजय हजारे क्रिकेट स्पर्धेची ट्रॉफी पटकावली. कर्णधार पृथ्वीच्या कुशल नेतृत्वात मुंबई संघाने फायनलमध्ये उत्तर प्रदेश टीमवर मात केली. मुंबईच्या टीमने ४१.३ षटकांत सहा गड्यांनी सामना जिंकला. यासह मुंबई संघ करिअरमध्ये चाैथ्यांदा या स्पर्धेच्या विजेतेपदाचा मानकरी ठरला.

दिल्लीच्या मैदानावर प्रथम फलंदाजी करताना उत्तर प्रदेश संघाने ४ बाद ३१२ धावा काढल्या हाेत्या. प्रत्युत्तरात मुंबई संघाने चार गड्यांच्या मोबदल्यात ५१ चेंडू राखून विजयश्री खेचून आणली. संघाच्या विजयात शम्स मुुलानी (३६) आणि शिवम दुबे (४२) यांनीही माेलाचे योगदान दिले. त्यामुळे मुंबईला झटपट विजय संपादन करता आला.

आवाक्यातले लक्ष्य गाठण्यासाठी सलामीवीर व कर्णधार पृथ्वी शाॅने संघाला दमदार सुरुवात करून दिली. या दरम्यान त्याला यशस्वी जैस्वालची (२९) माेलाची साथ मिळाली.या दोघांनी (८९) अर्धशतकी भागीदारी सलामी दिली. त्यानंतर आदित्य तारेने मैदानावर आपला जम बसवला. त्याने उत्तर प्रदेशच्या सुमार गोलंदाजीचा खरपूस समाचार घेत शतक साजरे केले. त्याने १०७ चेंडूंत १८ चौकारांसह ११८ धावांची नाबाद खेळी केली. तसेच पृथ्वीने ३९ चेंडूंमध्ये ७३ धावा काढल्या. यामध्ये १० चौकार आणि चार उत्तुंग षटकारांचा समावेश आहे. यासह त्याने टीमचा विजयाचा मार्ग अधिक सुकर केला.

स्पर्धेची खास वैशिष्ट्ये
- ८७ सर्वाधिक शतके
- ४५७ धावसंख्या मुंबईची
- ८२७ धावा सत्रात पृथ्वीच्या
- २२७ नाबाद स्कोअर पृथ्वीचा
- ०४ सलग शतके पड्डिकलची

चाैथ्या विजेतेपदासह मुंबई दुसरा यशस्वी संघ ठरला
मुंबई संघाने करिअरमध्ये चाैथ्यांदा या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. यापूर्वी मुंबईचा संघ २००३-०४, २००६-०७ आणि २०१८-१९ मध्ये या स्पर्धेची फायनल जिंकली हाेती. यासह या स्पर्धेतील यशस्वी संघाच्या यादीत मुंबई टीमने संयुक्तपणे दुसरे स्थान गाठले. विजेतेपदामध्ये मुंबईने कर्नाटक टीमची बराेबरी साधली. सर्वाधिक पाच विजेतेपदासह तामिळनाडू अव्वल स्थानी आहे.

पृथ्वीच्या आठ डावांत ८०० धावा पूर्ण
पृथ्वी शॉने अंतिम सामन्यातही तुफानी फटकेबाजी करताना अर्धशतक साजरे केले. त्याने सामन्यात ७३ धावांची खेळी केली. यासह त्याच्या नावे आठ डावात एकूण सर्वाधिक ८२७ धावांची नाेंद झाली आहे. सत्रातील एका स्पर्धेत ८०० पेक्षा अधिक धावा काढणारा पृथ्वी हा भारताचा पहिला फलंदाज ठरला आहे.

बातम्या आणखी आहेत...