आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू विजय शंकरने आपल्या आयुष्याच्या नवीन इनिंगला सुरुवात केली आहे. बुधवारी वैशाली विश्वेश्वर हिच्यासोबत विजय शंकर लग्नाच्या बेडीत अडकला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत या दोघांचे लग्न झाले. विशेष म्हणजे 26 जानेवारीला त्याने आपला 30 वा वाढदिवस साजरा केला होता.
गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये विजय आणि वैशाली यांचा साखरपुडा झाला होता. विजयची पत्नी चेन्नईत पार्ट टाइम टीचर म्हणून काम करते. कोरोना दरम्यान, सप्टेंबरमध्ये विजय युएईमध्ये पार पडलेल्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मध्ये सहभागी झाला होता.
विजय आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबाद (एसआरएच) कडून खेळतो. या फ्रँचायझीने विजयच्या लग्नाचा फोटो सोशल मीडियावर शेअर करुन त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. विजय शंकर यांना जीवनातील या अविस्मरणीय दिवसासाठी खूप खूप शुभेच्छा, असे कॅप्शन या फोटोला देण्यात आले आहे.
मागील वर्षी साखरपुड्यानंतर विजय शंकरचे वडील एच शंकर यांनी माध्यमांना सांगितले होते की, "हे लव्ह मॅरेज नाही. माझ्या मुलाला क्रिकेटवर लक्ष केंद्रित करायचे आहे. त्याच्या लग्नासाठी आम्ही मुली बघतोय हेही त्याला माहित नव्हते. आम्ही बर्याच मुलींसोबत विजयची कुंडली जुळवली. पण वैशालीसोबत कुंडली सर्वात चांगली जुळली," असे ते म्हणाले.
विजयने 2018 मध्ये टीम इंडियाकडून ट्वेंटी 20 संघातून पदार्पण केले होते. 2019 मध्ये टीम इंडियाकडून त्याची निवड एकदिवसीय विश्वचषक सामन्यासाठी झाली होती. त्याने आतापर्यंत 12 एकदिवसीय सामन्यांमध्ये 223 धावा केल्या आहेत आणि 4 विकेट्स घेतल्या आहेत. विजयने 9 टी -20 मध्ये 101 धावा आणि 5 विकेट्स घेतल्या होत्या. आयपीएलमध्ये तो 40 सामने खेळला. यात त्याने 654 धावा केल्या आणि 6 विकेट्स घेतल्या.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.