आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

क्रिकेट:व्हिन्सी प्रीमियर टी-10 लीग : चेंडूला चकाकीसाठी लाळेच्या वापरावर बंदी घालणारी पहिली स्पर्धा, 22 मेपासून सुरुवात

जमैकाएका वर्षापूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
  • कोरोना व्हायरसदरम्यान कॅरेबियन देश सेंट व्हिन्संेटमध्ये होईल स्पर्धा, सहा संघांमध्ये रंगणार एकूण 30 सामने

कोरोना व्हायरसदरम्यान व्हिन्सी प्रीमियर टी-१० लीगला २२ मेपासून सुरुवात होत आहे. या महामारीदरम्यान होत असलेली ही पहिली स्पर्धा असून यात चेंडूला चकाकी देण्यासाठी लाळेच्या उपयोगावर बंदी असेल. आयसीसी चेंडूवर लाळ व घाम लावण्यावर बंदी आणण्याची तयारी करत आहे. त्यासाठी वैद्यकीय टीम पर्याय शोधत आहे. ऑस्ट्रेलियन कंपनी कुकाबुराने चकाकीसाठी कृत्रिम वस्तू तयार करण्याबाबत म्हटले आहे. मार्चनंतर पहिल्यांदा कोणत्या स्पर्धेत आंतरराष्ट्रीय खेळाडू खेळतील. यात वेस्ट इंडीजचा केसरिक विलियम्स व सुनील अंबरीशचा समावेश आहे.

लाळेचा कसोटीला धाेका

वनडे, टी-२० किंवा टी-१० मध्ये लाळेचा अधिक प्रभाव दिसत नाही. एका वनडे सामन्यात दोन्ही डावात नवीन चेंडू वापरला जातो. लाळेचा उपयोग कसोटीमध्ये महत्त्वपूर्ण ठरतो. कारण एका चेंडूचा वापर ८० षटके केला जातो. स्विंग व रिव्हर्स स्विंगसाठी लाळ किंवा घामाचा उपयोग करावाच लागतो. कसोटीचा नंबर वन गोलंदाज ऑस्ट्रेलियाचा पॅट कमिन्सने देखील त्याची बाजू घेतली आहे.

खेळाडू-चाहत्यांची भेट नाही

खेळाडू सामन्यादरम्यान चाहत्यांशी भेटू शकणार नाहीत. सरकारकडून मिळणाऱ्या सूचनांचे पालन केले जाईल. सामन्या दरम्यान छोटी विश्रांती असेल, ज्यात खेळाडूंना हात सॅनिटायझर करता येईल. सर्व संघांना सरावासाठी मुबलक जागा देण्यात आली आहे, ज्यात सोशल डिस्टन्सिंगसह सराव करता येईल. त्यासह भ्रष्टाचार संबंधी नियमांचेदेखील पालन केले जाईल, असेही या वेळी संघटनेेचे साेलाे म्हणाले.

चाहत्यांसाठी स्टेडियम आेपन

आयोजकांकडून चाहत्यांना येण्यास बंदी घालण्यात आलेली नाही. डिस्टन्सिंगसाठी चाहत्यांमध्ये काही खुर्च्या मोकळ्या सोडाव्या लागतील. कारण सरकारकडून बंदी नाही. आयोजक सेंट विन्सेट अँड दि ग्रेनाडाइन्स क्रिकेट संघटनेचे (एसव्हीजीए) अध्यक्ष किशोर सालोने म्हटले की, विनवर्ड आइसलँड क्रिकेट संघटनेच्या माध्यमातून क्रिकेट वेस्ट इंडीजला (सीडब्ल्यूआय) प्रस्ताव पाठवला आहे.

१५ मार्चनंतर पहिला अधिकृत सामना रंगणार

पाकिस्तान प्रीमियर लीगमध्ये १५ मार्च रोजी कराची व क्वेट्टादरम्यान झालेल्या सामन्यानंतर संपूर्ण क्रिकेट बंद झाले. त्यानंतर पूर्ण सदस्य असलेल्या देशात खेळवण्यात येणारा पहिला अधिकृत सामना असेल. आयसीसीने असोसिएट सदस्य वानूआतु खेळ सुरू करणारा पहिला देश बनला. या लीगमध्ये ६ संघांत एकूण ७२ खेळाडूंना स्थान मिळाले. आयाेजकांनी यासाठी नियम तयार केला. यामुळे प्रत्येक दिवशी तीन सामने खेळवण्यात येतील. सेंट विन्सेटमध्ये कोरोनाचे १८ पैकी १० लोक पूर्णपणे बरे झाले.

बातम्या आणखी आहेत...