आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी ॲनालिसिस:गत 18 महिन्यांत काेहलीची सरासरी 25 पेक्षाही कमी

मुंबई25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोहली, रहाणे, पुजारा 2020 पासून अपयशी

भारतीय क्रिकेट संघाला पहिल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात पराभवाला सामाेरे जावे लागले. आता भारतीय संघ ४ ऑगस्टपासून इंग्लंड विरुद्ध पाच कसाेटी सामन्यांची मालिका खेळणार अाहे. मात्र, फलंदाजी संघासाठी अडचणीची ठरत आहे. अंतिम सामन्यात संघाचा एकही फलंदाज अर्धशतक करु शकला नाही. फेब्रुवारीत भारताने इंग्लंड विरुद्ध घरच्या मैदानावर ४ कसोटी खेळल्या होत्या. ज्या केवळ रोहित, अश्विन व पंतने शतके काढली होती. पुजाराने शेवटचे शतक २०१९ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध झळकवले. ३० डावांत त्याची सर्वाधिक धावसंख्या ८१ आहे. कर्णधार कोहलीने २०१९ नंतर शतक साजरे केले नाही. त्याची सरासरी २५ पेक्षा कमी राहिली.

कोहली, रहाणे, पुजारा 2020 पासून अपयशी
भारतीय फलंदाजांमध्ये रोहित शर्माने २००७ मध्ये पदार्पण केले.मात्र, कसोटीत विराट, पुजारा व रहाणेकडे अधिक अनुभवी आहेत. या तिघांनी मिळून २५२ कसोटी खेळल्या. मात्र, २०२० पासून कसोटीमध्ये त्यांची फलंदाजी सरासरी ३० पेक्षा कमी राहिली. त्यामुळे, इंग्लंड विरुद्ध घरच्या मालिकेत देखील भारतीय संघ संघर्ष करताना दिसला.

बातम्या आणखी आहेत...