आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यात रोहित शर्मा प्रथमच पूर्णवेळ वनडे कर्णधार म्हणून मैदानात उतरला. भारताचा माजी कर्णधार विराट कोहली प्रथमच रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळत आहे. 4 वर्षे टीम इंडियाचा कर्णधार राहिलेल्या विराटला वनडे संघाच्या कर्णधारपदावरून हटवण्यात आले, तेव्हा त्यांच्यातील मतभेदाची बातमी समोर आली होती.
रोहित शर्माच्या वाढत्या उंचीची कोहलीला अडचण असल्याचे बोलले जात होते, पण मॅचदरम्यान असे काहीच दिसले नाही.
रोहित आहे कर्णधार, फील्डिंग सेट करत होता कोहली
या सामन्यादरम्यान कोहली मैदानावर त्याच उत्कटतेने खेळताना दिसला ज्यासाठी तो ओळखला जातो. संघासाठी सर्वस्व पणाला लावणारा विराट मैदानावर दिसत होता. तो रोहित शर्मालाही खूप मदत करताना दिसला.
त्याने रोहितला क्षेत्ररक्षणाचा सल्लाही दिला. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रोहितने रिव्ह्यू घेतला तेव्हा विराट कोहलीही आपले मत मांडताना दिसला.
विराट रोहितची अप्रतिम केमिस्ट्री
वेस्ट इंडिजच्या डावाच्या 20व्या षटकात विराट आणि रोहित शर्माची जबरदस्त केमिस्ट्री पाहायला मिळाली. युझवेंद्र चहलने पोलार्डला बोल्ड करताच दोघेही एकत्र सेलिब्रेशन करताना दिसले. चहलने या सामन्यात लागोपाठ दोन चेंडूत दोन विकेट घेतल्या.
यानंतर कोहली शॉर्ट लेगवर क्षेत्ररक्षण करताना दिसला. विराट कोहलीच्या सांगण्यावरून कर्णधार रोहित शर्माने 22व्या षटकात डीआरएसही घेतला.
दोघांसाठी संघ महत्त्वाचा
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत टीम इंडियाने कसोटी आणि वनडे अशा दोन्ही मालिका गमावल्या आहेत. कसोटी मालिकेतील पराभवानंतर विराट कोहलीने कर्णधारपद सोडले. रोहित शर्माला कसोटीचा पुढचा कर्णधार बनवला जाऊ शकते, अशीही बातमी आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.