आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराटीम इंडियाचा स्टार क्रिकेटर विराट कोहलीने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीनंतर नॉर्वेजियन डान्स ग्रुप ‘क्विक स्टाइल’ची भेट घेतली. कोहली 'स्टिरीओ नेशन'च्या 'इश्क' गाण्यावर डान्स करताना दिसला. याआधी क्रिकेटरने डान्स क्रूच्या सदस्यांसोबतचा एक फोटोही शेअर केला होता. यामध्ये कोहलीने त्याच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये लिहिले आहे की, मी मुंबईत कोणाला भेटलो ते पहा.
विराट कोहलीने बॅटचा वापर कसा करायचा हे सांगितले
क्विक स्टाइलचा एक सदस्य व्हिडिओच्या सुरुवातीला क्रिकेटची बॅट उचलतो,पण त्याचे काय करावे हे त्याला सुचत नाही. त्यानंतर पांढरा टी-शर्ट आणि काळी जीन्स परिधान केलेला, कोहली बॅट धरून आणि डान्सवर स्टेप्स करत दृश्यात जातो आणि डान्स क्रू कोहलीच्या डान्स स्टेप्सला फालो करतात
क्विक स्टाइल बॉलिवूड गाण्यांवर डान्स करण्यासाठी प्रसिद्ध आहे
नॉर्वेचा डान्स क्रू बॉलीवूड गाण्यांवर क्विक स्टाइल डान्ससाठी प्रसिद्ध आहे. क्विक स्टाईलने काही महिन्यांंपूर्वी त्याच्याच जोडीदाराच्या लग्नात काला चष्मा आणि सदी गल्ली या गाण्यांवर डान्स केला होता. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यानंतर डान्स क्रूची लोकप्रियता वाढली. क्विक स्टाईल सोशल मीडियावर भारतीय आणि पाकिस्तानी गाण्यांवर डान्स व्हिडिओ अपलोड करत असते.
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या शेवटच्या कसोटीत कोहलीने शतक झळकावले
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध अहमदाबादमध्ये झालेल्या शेवटच्या कसोटीत विराट कोहलीने 364 चेंडूत 186 धावांची मॅरेथॉन इनिंग खेळली. त्याने 520 मिनिटे फलंदाजी केली. यासह, त्याने 1205 दिवसांनी आपल्या कसोटी कारकिर्दीतील 28 वे शतक झळकावले. तिन्ही फॉरमॅटसह विराटच्या नावावर 75 आंतरराष्ट्रीय शतके आहेत.
ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील शेवटची कसोटी अनिर्णित राहिली, पण भारत आता WTC म्हणजेच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. इंग्लंडची राजधानी लंडनमधील ओव्हल मैदानावर 7 जून रोजी भारताचा ऑस्ट्रेलियाशी सामना होणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.