आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • Virat Kohli Fitness Secrets; IND VS PAK | Kohli Endurance And Stamina Training, Virat's Formula To Strengthen Lungs: Virat's Practice With A High Altitude Mask Before The Big Game, So That He Never Gets Tired On The Field

फुफ्फुसांना बळकट करण्याचा विराटचा फॉर्म्युला:हाय अल्टीट्यूड मास्क लावून विराटचा सराव, ज्यामुळे तो मैदानावर थकत नाही

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

फिटनेसच्या बाबतीत विराट कोहलीचे सगळीकडेच कौतुक होत असते. फॅन असो की एक्स्पर्ट, प्रत्येकजण त्याच्या फिटनेसच्या बाबत त्याला मानतो. पण कोहली बनणे इतके सोपे नाही. विराट त्याचा फिटनेस लेव्हल मेंटेन ठेवण्यासाठी तो खूप मेहनत घेतो.

स्वतःसाठी तो हाय पॅरामीटर सेट करतो आणि मग तो स्वताच ते साध्य करण्याचा प्रयत्न करतो.विराटच्या प्रशिक्षणाचा असाच एक भाग म्हणजे एंड्योरेंस ट्रेनिंग... ज्याच्यामुळे तो मैदानावर कधीही थकत नाही.

भारत-पाकिस्तान सामना 4 सप्टेंबरला दुबईत होणार आहे. याआधी विराट कोहली हाय अल्टीट्यूड मास्क घालून जमिनीवर धावताना दिसला
भारत-पाकिस्तान सामना 4 सप्टेंबरला दुबईत होणार आहे. याआधी विराट कोहली हाय अल्टीट्यूड मास्क घालून जमिनीवर धावताना दिसला

आशिया कपच्या सुपर-4मध्ये रविवारी भारत-पाकिस्तान सामना रंगणार आहे. याआधी शनिवारी सोशल मीडियावर एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये विराट कोहली एंड्योरेंस ट्रेनिंग घेताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये कोहली हाय अल्टीट्यूड मास्क घालून मैदानात धावताना दिसत आहे.

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की हाय अल्टीट्यूड मास्क घालून धावण्याचा उद्देश हा आहे की फुफ्फुसे मजबूत होतात आणि कमी हवेतही न थकता ते चांगले काम करतात.

विराट अनेकदा त्याचे फिटनेस फोटो-व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत असतो. या फोटोसोबत त्याने 30 ऑगस्ट रोजी वेट लिफ्टिंगचे इमोजी शेअर केले होते.
विराट अनेकदा त्याचे फिटनेस फोटो-व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत असतो. या फोटोसोबत त्याने 30 ऑगस्ट रोजी वेट लिफ्टिंगचे इमोजी शेअर केले होते.

खेळाडूंसाठी फिटनेस आयकॉन आहे कोहली

विराट कोहली हा इतर खेळाडूंसाठी फिटनेस आयकॉन आहे. दिग्गज क्रिकेटपटू असोत... क्रिकेटचे चाहते असोत की तज्ज्ञ असोत, सगळेच त्याचे कौतुक करतात. तो त्याच्या सोशल मीडियाच्या अकाउंटवर सतत फिटनेसचे व्हिडिओही शेअर करत असतो. मागील व्हिडिओमध्ये विराट जिममध्ये वेट अँड बॅलन्स ट्रेनिंग करताना दिसला होता.

हाँगकाँगविरुद्ध जडले अर्धशतक

31 ऑगस्टला झालेल्या हाँगकाँगविरुद्धच्या सामन्यात विराटने 44 चेंडूत नाबाद 59 धावा केल्या होत्या. विराटने या खेळीत 1 चौकार आणि 3 षटकार ठोकले होते. त्याने आपल्या डावात 134 च्या स्ट्राईक रेटने 59 धावा केल्या.

31 ऑगस्ट रोजी हाँगकाँगवर विजय मिळवल्यानंतर कोहलीने फोटो पोस्ट केला आणि लिहिले - चांगला विजय. सूर्यकुमारची खास खेळी. आम्ही असेच पुढे जात राहू.
31 ऑगस्ट रोजी हाँगकाँगवर विजय मिळवल्यानंतर कोहलीने फोटो पोस्ट केला आणि लिहिले - चांगला विजय. सूर्यकुमारची खास खेळी. आम्ही असेच पुढे जात राहू.

विराटची 6 महिन्यांनंतर अर्धशतकी खेळी

भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीचा अलीकडचा फॉर्म चांगला नव्हता. सततच्या खराब कामगिरीमुळे त्याला लोकांच्या तीव्र प्रतिक्रियांचा सामना करावा लागला. गेली 3 वर्षे तो प्रत्येकी एक धाव घेण्यासाठी धडपड करताना दिसत होता पण त्याला यश मिळत नव्हते.

मात्र कोहलीने बुधवारी झालेल्या हाँगकाँगविरुद्धच्या सामन्यात सहा महिन्यांनंतर पहिले अर्धशतक झळकावले. कोहलीने त्याच्या दोन अर्धशतकांमध्ये तब्बल 11 डावांचा अवधी घेतला

विराट शेवटचे अर्धशतक 18 फेब्रुवारी 2022 रोजी वेस्ट इंडिजविरुद्ध केले होते. त्या सामन्यात त्याने 41 चेंडूत 52 धावा केल्या होत्या.
विराट शेवटचे अर्धशतक 18 फेब्रुवारी 2022 रोजी वेस्ट इंडिजविरुद्ध केले होते. त्या सामन्यात त्याने 41 चेंडूत 52 धावा केल्या होत्या.
बातम्या आणखी आहेत...