आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहिला प्रीमियर लीग 2023 (WPL) च्या पहिल्या सत्रात रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) च्या खराब सुरुवातीनंतर, भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू विराट कोहलीने महिला संघाची भेट घेतली आणि त्यांच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.
त्याने महिला खेळाडूंशी संवाद साधून संघाच्या विजयाचा मंत्र दिला. WPL चा 13 वा सामना बुधवारी यूपी वॉरियर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यात खेळला गेला. RCB ने स्पर्धेतील पहिले पाच सामने गमावले तर बुधवारी यूपी वॉरियर्सविरुद्ध पहिला विजय नोंदवला.
RCB ने सोशल मीडियावर शेअर केला व्हिडिओ
फ्रेंचाइजीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये कोहली IPL मधील त्याच्या संघर्षांबद्दल बोलताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये कोहली म्हणतोय, मी 15 वर्षांपासून IPL खेळत आहे, पण मी अद्याप एकही विजेतेपद जिंकलेले नाही. पण ते मला दरवर्षी उत्साही होण्यापासून थांबवत नाही.
मी एवढेच करू शकतो, मी प्रत्येक सामन्यात प्रयत्न करू शकतो. मी प्रत्येक सामन्यात आणि प्रत्येक टूर्नामेंटमध्ये असा विचार करतो की आपण जिंकलो तर फारच छान, समजा नाही जिंकलो तर मी असा विचार करत नाही की मी IPLजिंकलो तरच आनंदाने मरू शकेन. असे काही होत नाही.
आमच्याकडे जगातील सर्वोत्तम चाहते आहेत
नेहमी तुमच्याकडे असलेल्या संधीचा विचार करा शिवाय सध्या किती वाईट घडत आहे असा विचार करण्यापेक्षा. आम्ही अद्याप IPL जिंकलेलो नाही, पण तरीही मला वाटते की आमच्याकडे जगातील सर्वोत्तम चाहते आहेत. कारण आम्ही RCB साठी वचनबद्ध आहोत, ही आमच्या चाहत्यांसाठी सर्वात मोठी गोष्ट आहे. आम्ही चाहत्यांना दरवर्षी ट्रॉफी देऊ शकत नाही, परंतु आम्ही त्यांना प्रत्येक वेळी आमचे 110% देऊ शकतो.
RCB ने मिळवला पहिला विजय
स्मृती मानधनाच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने बुधवारी महिला प्रीमियर लीगमध्ये पहिला विजय मिळवला. संघाने यूपी वॉरियर्सचा 5 गडी राखून पराभव केला. या विजयासह बंगळुरूने लीगच्या प्ले-ऑफमध्ये प्रवेश करण्याच्या आशा कायम ठेवल्या आहेत.
मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर बेंगळुरूने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. युपीने प्रथम फलंदाजी करताना हॅरिस-दीप्तीच्या अर्धशतकी भागीदारीच्या जोरावर 135 धावा केल्या. बंगळुरूने 18 षटकांत 5 गडी गमावून 136 धावांचे लक्ष्य गाठले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.