आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आगामी यजमान ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेतील सलामीचीच कसाेटी खेळणार आहे. १७ डिसेंबरपासून सुरू होत असलेल्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेच्या पहिल्या कसोटीनंतर तो पॅटर्निटी लीव्हवर भारतात परतेल. कोहलीच्या बाहेर होण्यावर ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक जस्टिन लँगर यांनी म्हटले की, मी आपल्या करिअरमध्ये जेवढे खेळाडू पाहिले आहेत, त्यात विराट कोहली सर्वोत्कृष्ट आहे. कोहली नसल्यास टीम इंडियावर परिणाम होईल. तो संघाचा सर्वोत्कृष्ट फलंदाज आहे. कोणत्याही संघाचा उत्कृष्ट खेळाडू न खेळल्यास निश्चित संघाची कामगिरी खराब होते. लँगर म्हणाले, ‘तो सर्वश्रेष्ठ खेळाडू आहे, मी करिअरमध्ये त्याच्यापेक्षा उत्कृष्ट फलंदाज पाहिला नाही. कोहली केवळ फलंदाजीच चांगली करतो असे नाही, त्याच्यात वेगळाच जोश असतो आणि खेळाचे वेड आहे. तो मैदानावर कायम उत्साही दिसतो.’ त्यांनी म्हटले, तो खेळत नसल्याने आम्ही आनंदी आहोत असे नाही. आम्ही कोहलीच्या निर्णयाचा आदर करतो. कारण, त्याने मुलाच्या जन्मासाठी न खेळण्याचा निर्णय घेतला. आम्हाला माहिती आहे, गत मालिकेत आम्ही त्यांच्याकडून पराभूत झालो आहोत. भारतीय टीम चांगली आहे. टीम इंडियाने २०१८-१९ मध्ये अखेरच्या दौऱ्यात ऑस्ट्रेलियाला कसोटी मालिकेत २-१ ने हरवले होते. कोहलीने मालिकेत ४०.२८ व्या सरासरीने २८२ धावा काढल्या. भारताला दौऱ्यात तीन वनडे आणि तीन टी-२० सामन्यांची मालिका खेळायची आहे. रोहित शर्मा मर्यादित षटकांची मालिका खेळत नाही, मात्र कसोटी मालिकेत उतरू शकतो.
तरीदेखील टीम इंडिया मजबूत : लायन
ऑस्ट्रेलियाचा अनुभवी फिरकीपटू नाथन लायनच्या मते, कोहलीचे अखेरच्या तीन कसोटीत न खेळणे निराशाजनक आहे. आम्ही मालिकेचे दावेदार होऊ शकत नाही. कारण, टीम इंडियामध्ये अनेक स्टार खेळाडू आहेत. कसोटीतज्ज्ञ लायनने म्हटले की, ‘ही गोष्ट मालिकेसाठी निश्चित निराशाजनक आहे. तुम्ही जगातील सर्वोत्कृष्ट खेळाडूविरुद्ध खेळू इच्छितात. माझ्या मते, स्टीव्ह स्मिथ व मार्नस लबुशेनसह सध्याचा उत्कृष्ट फलंदाज आहे.’ त्याने म्हटले, भारतीय संघात चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणेसारख्या अव्वल फलंदाजांसह युवा खेळाडू आहे. आमच्यासाठी तेव्हाही मोठे आव्हान असेल. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली खेळत नाही याचा अर्थ आमचे ट्रॉफी जिंकणे निश्चित झाले असा होत नाही. आम्हाला तेव्हाही मेहनत घ्यावी लागेल, असा इशाराही त्याने आपल्या टीमला दिला.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.