आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराश्रीलंकेविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत विराट कोहली पुन्हा एकदा फलंदाजी करताना झुंजताना दिसला. दुसऱ्या कसोटीपूर्वी कोहलीची कसोटी सरासरी ५०.३५ होती. तिन्ही प्रकारांत ५० सरासरी राखणारा तो जगातील एकमेव खेळाडू होता. मात्र, दुसऱ्या कसोटीत तो २३ व १३ धावांवर बाद झाला, त्यामुळे त्याची सरासरी घसरत ४९.९५ झाली. ऑगस्ट २०१७ आणि ४० सामन्यांनंतर प्रथमच सरासरी ५० च्या खाली गेली आहे. या मालिकेतही पुन्हा एकदा फिरकी गोलंदाजीने माजी कर्णधाराला अडचणीत आणले आणि त्याची शतकाची प्रतीक्षा अद्याप संपलेली नाही. श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतील दोन्ही सामन्यांमध्ये त्याला एम्बुल्डेनिया, डिसिल्व्हा व जयविक्रमा या फिरकी गोलंदाजांनी बाद केले. विशेषत: फिरकीविरुद्ध कोहलीच्या अडचणीबद्दल तज्ज्ञही चिंतेत आहेत. त्याचे लहानपणीचे प्रशिक्षक राजकुमार शर्मा यांनी म्हटले की, ‘महाराजविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात चेंडू थांबून बॅगकडे येत होता. तो खराब फलंदाजी करत आहे किंवा त्याला सुधारण्याची गरज आहे असे नाही. त्याला त्याची फलंदाजी माहीत आहे.’
२०१८ आयपीएलपासून कोहलीचा फिरकीशी संघर्ष
२०१८ च्या आयपीएलपासून कोहली फिरकीविरुद्ध संघर्ष करत असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. तो फिरकीच्या विरोधात अधिक सावध झाला आहे, हे दिसून येत आहे. आयपीएल २०२१ मध्ये कोहलीचा फिरकीविरुद्धचा स्ट्राइक रेट इतर फलंदाजांच्या तुलनेत सर्वात वाईट होता.
फुल लेंथ चेंडू बॅकफूटवर खेळताना कोहलीची अडचण; बेसिकवर लक्ष देण्याची गरज
2021 आयपीएलमध्ये फिरकीविरुद्ध सर्वात खराब स्ट्राइक रेट (कमीत कमी ७५ चेंडूंचा सामना केल्यानंतर) माजी सलामीवीर आकाश चोप्राच्या मते, फुल लेंथ चेंडू बॅकफूटवर खेळण्याची कोहलीची समस्या आहे. आम्ही त्याच्या धावांबद्दल बोलत नाही, आम्ही त्याच्या खेळण्याच्या शैलीबद्दल बोलतोय, तो कसा खेळतोय, तो कोणत्या प्रकारचे फटके मारतोय, याची काळजी करतो. त्यांच्या फटके निवडण्यात चूक झाली असेल, तर ती मोठीच अडचणीची बाब आहे.’ कोहलीसोबत खेळलेल्या गौतम गंभीरने म्हटले की, ‘मोठी चिंतेची बाब म्हणजे, कोहलीची बॅट पॅडशी सुसंगत आहे. जेव्हा असे होते, तेव्हा वळण घेणारे चेंडू खेळणे कठीण होते. कोहलीच्या बाबतीत, तो बाहेर जाणाऱ्या चेंडूवर अडखळतोय, म्हणूनच तुमची बॅट पॅडपासून लांब राहणे फार महत्त्वाचे आहे. दुसरीकडे, मर्यादित षटकांच्या खेळता कोहलीने प्रभावित केले आह. सध्याच्या काळात मर्यादित षटकांच्या क्रिकेटमुळे खेळाडू आपल्या क्रिकेटच्या मूळ गोष्टी विसरत आहेत. वेगवान गोलंदाजीला सामोरे जाण्यावर त्याने बरेच लक्ष केंद्रित केले. मला वाटते की, भारतीय फलंदाजांनी फिरकीलाही सामोरे जायला शिकले पाहिजे.’
खेळाडू स्ट्राइक रेट धावा
कोहली 107.5 86
राहुल 120 108
धवन 120.7 169
बेयरस्टो 120.7 99
मनीष पांडे 126.7 95
1. श्रीलंका व द. आफ्रिकेविरुद्ध पाच कसोटी सामन्यांत फिरकीपटूंचा शिकार बनला. 2. २०२१ आयपीएलमध्ये फिरकीविरुद्ध त्याचा स्ट्राइक रेट (१०७.५) इतरमध्ये सर्वात खराब. 3. २०१७ नंतर कोहलीचा स्ट्राइक रेट फिरकीपटूंविरुद्ध खालावत चालला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.