आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
भारत आणि इंग्लंड यांच्यात गुरुवारपासून सुरू होत असलेली चाैथी कसोटी ऐतिहासिक होईल. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाईल. विराट कोहली भारतासाठी सर्वाधिक कसोटीत नेतृत्व करणाऱ्या महेंद्रसिंग धोनीच्या विक्रमाशी बरोबरी करेल. यात कोहलीला ३५ विजय मिळाले आहेत. दुसरीकडे, धोनीने २७ सामने जिंकले होते. कोहली विजयासह जल्लोष करू इच्छितो. हा सामना बरोबरीत सुटला तरी भारतीय संघ कसोटी चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पोहोचेल. गत दोन सामन्यांत इंग्लंडला मोठा पराभव स्वीकारावा लागला. ते मालिकेत १-२ ने पिछाडीवर आहे. पाहुणा संघ फिरकी खेळपट्टीवर संघर्ष करताना दिसत आहे. ते देखील पुनरागमन करू इच्छितात. मात्र, मालिकेवर लक्ष्य ठेवून असलेले लोक पुन्हा एकदा खेळपट्टीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करू शकतात. जसप्रीत बुमराहने वैयक्तिक कारणामुळे सामन्यातून माघार घेतली आहे. आता पाहावे लागेल की, कुलदीप यादवला संधी मिळते का, सुंदर अंतिम अकरामध्ये कायम राहील.
ऑस्ट्रेलियाची न्यूझीलंडवर मात
वृत्तसंस्था | वेलिंग्टन
ऑस्ट्रेलियाने पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील तिसऱ्या लढतीत न्यूझीलंडला ६४ धावांनी हरवले. न्यूझीलंड सध्या मालिकेत २-१ ने पुढे आहे. प्रथम खेळताना ऑस्ट्रेलियाने २०८ धावा काढल्या. पहिल्या दोन सामन्यांत अपयशी ठरलेला ग्लेन मॅक्सवेलने ३१ चेंडूंत ७० धावांची खेळी केली. त्याने डावाच्या १७ व्या षटकात जिमी निशमविरुद्ध सर्व चेंडूंवर चौकार खेचत २८ धावा चोपल्या. टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चौथ्यांदा अशी कामगिरी घडली. कर्णधार अॅरोन फिंचने ६९ धावा ठोकल्या. प्रत्युत्तरात त्यांचा संपूर्ण संघ १८ षटकांत १४४ धावांवर ढेपाळला. डावखुरा फिरकीपटू एश्टन एगरने ३० धावा देत ६ गडी बाद केले. तो ६ बळी घेणारा जगातील चौथा व पहिला डावखुरा गोलंदाज बनला. ही आशियाबाहेरील गोलंदाजीची सर्वोत्कृष्ट कामगिरी ठरली. भारताच्या दीपक चाहरच्या नावे ७ धावांत ६ बळींचा विक्रम आहे.
इंग्लंड संघात फिरकीपटू बेसचे पुनरागमन शक्य
दुसरीकडे, इंग्लिश संघ काय करेल, कोणाला माहिती नाही. बदली पद्धतीमुळे ते अनेक वेळा आर्श्चयकारक निर्णय घेतात. मालिका वाचवण्यासाठी ते आपला उत्कृष्ट संघ उतरवू शकतात. ऑफ स्पिनर डॉम बेस सामन्यात परतू शकतो. फलंदाजी क्रमात बदल शक्य आहे. बेयरस्टोला संधी मिळू शकते. पुन्हा एकदा जबरदस्त सामना पाहायला मिळू शकतो, अशी सर्वांची अपेक्षा आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.