आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • Virat's 90 minute Innings Sends Fans Into Raptures: 12 Fours And 6 Sixes Against Afghanistan, Highest Ever

विराटच्या 90 मिनिटांच्या खेळीने चाहत्यांमध्ये जल्लोष:अफगाण विरूद्ध 12 चौकार आणि 6 षटकार, आतापर्यंतची सर्वात मोठी धावसंख्या

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राहत इंदोरी यांचा एक प्रसिद्ध शेर आहे - “अभी गनीमत है सब्र मेरा, अभी लबालब भरा नही हूं, वो मुझको मुर्दा समझ रहा है, उसे कहो मैं मरा नही हूं।’’

गुरुवारी विराट कोहलीने दुबई क्रिकेट स्टेडियमवर 1020 दिवसाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर कारकिर्दीतील 71 वे शतक झळकावले, तेव्हा त्याच्या मनातही राहत इंदौरीच्या शेर सारखेच काहीसे विचार येत असतील. सामन्यात फरीद मलिकच्या चेंडूला डीप-मिडविकेटवर सिक्सर मारून विराटने शतक पूर्ण केले, तेव्हा संपूर्ण भारत आशिया चषकातून बाहेर होण्याचे दु:ख काही काळ का होत नाही विसरला होता.

70 व्या शतकापासून 71 व्या शतकाची प्रतीक्षेचा कालावधी हा तब्बल 72 सामन्यांचा होता. या काळात त्याने 26 अर्धशतके झळकावली. यानंतर त्यांचा शतकांचा दुष्काळ संपला. या वाईट टप्प्यात विराट कोहलीला 9 वेळा खातेही उघडता आले नाही.

कोहलीच्या शतकानंतर अफगाणिस्तानचा खेळाडू राशिद खानही त्याचे अभिनंदन करण्यासाठी आला होता.
कोहलीच्या शतकानंतर अफगाणिस्तानचा खेळाडू राशिद खानही त्याचे अभिनंदन करण्यासाठी आला होता.

मात्र, या शतकानंतरही विराटचे टीकाकार शांत बसले नाहीत. तेस म्हणतात की दुबळ्या अशा अफगाणिस्तानविरुद्ध शतक झाले. दुसरी बाब म्हणजे आपण आशिया चषकातून बाहेर पडल्यानंतर शतक झाले, त्यामुळे याला काही अर्थ नाही, हे एक निरर्थक शतक आहे. टीकाकार काहीही म्हणो मात्र पण विराटचे 71 वे शतक त्याच्या रेकॉर्ड बुकमधून काढू शकत नाहीत.

90 मिनिटांत जिंकली करोडो चाहत्यांची मने

अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा खेळला नाही. अशा स्थितीत विराटला सलामीला उतरण्याची संधी मिळाली. सुरुवातीपासूनच तो वेगळ्या अंदाजात दिसत होता त्याने पहिल्याच चेंडूला शॉट मारला. जो विराट मैदानात उतरल्यानंतर थोडा वेळ घ्यायचा त्याने आज येताच मोठे फटकेबाजी करायला सुरूवात केली.

विराट खेळताना असे वाटत होते की त्याच्या शरिरात ख्रिस गेलचा आत्मा आला आहे, किंग कोहलीने केवळ 61 चेंडूमध्ये 122 धावा लगावल्या. यादरम्यान त्याच्या बॅटमधून 12 चौकार आणि 6 षटकार आले आणि त्याचा स्ट्राईक रेट होता 200.

आता तेंडुलकरच्या विक्रमापासून 29 पावले दूर आहे

कोहलीने आतापर्यंत कसोटीत एक शतक, वनडेमध्ये 43 आणि टी-20मध्ये एक शतक झळकावले आहे. या शतकासह कोहलीने ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगच्या इंटरनॅशनल शतकांच्या रेकॉर्डशी बरोबरी केली आहे. पाँटिंगने त्याच्या इंटरनॅशनल कारकिर्दीत 71 शतके झळकावली होती. त्याने कसोटीत 41 आणि एकदिवसीय सामन्यात 30 शतके झळकावली. पाँटिंगने यासाठी 668 डाव खेळले.

कोहलीने 71 शतकांसाठी 522 डाव खेळले आहेत. आता त्याच्या पुढे फक्त सचिन तेंडुलकर आहे. क्रिकेटच्या देवाने आपल्या कारकिर्दीत 100 आंतरराष्ट्रीय शतके झळकावली होती. तेंडुलकरच्या नावावर कसोटीत 51 आणि वनडेत 49 शतके आहेत.

विराटने हे शतक पत्नी अनुष्का शर्मा आणि मुलगी वामिकाला समर्पित केले.
विराटने हे शतक पत्नी अनुष्का शर्मा आणि मुलगी वामिकाला समर्पित केले.

कोणत्याही भारतीय खेळाडूने खेळलेली सर्वोच्च टी-20 खेळी

कोहलीने अफगाणिस्तानविरुद्ध खेळलेली ही खेळी कोणत्याही भारतीय फलंदाजाने टी-20 इंटरनॅशनल सामन्यांमध्ये खेळलेली सर्वोत्तम खेळी आहे. त्याने या बाबतीत रोहित शर्माचा विक्रम मोडला आहे. याआधी रोहितने टी-20 इंटरनॅशनल सामन्यात 118 धावा केल्या होत्या.

याशिवाय टी-20 इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये 3500 हून अधिक धावा करणारा तो जगातील दुसरा फलंदाज ठरला आहे. भारताचा कर्णधार रोहित शर्मा पहिल्या क्रमांकावर आहे. त्याने 136 सामन्यात 3620 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर कोहलीच्या नावावर 3584 धावांची नोंद आहे.

या शतकानंतर कोहलीला क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटमध्ये सलामीवीर बनवणार का, अशीही चर्चा सुरू झाली आहे. याचे उत्तर खालील ग्राफिक्समध्ये आहे...

बातम्या आणखी आहेत...