आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • Asia Cup 2022: Virat Kohli Press Conference Pakistan Rohit Sharma, Virat's Regret Everyone Has My Number, Only Dhoni's Contact, Said On Captaincy Controversy People Talk On TV, But I Will Talk Face To Face

विराटची खंत - प्रत्येकाकडे माझा नंबर, फक्त धोनीचाच संपर्क:कॅप्टन्सीवर म्हणाला-लोक टीव्हीवर बोलतात, मी तोंडावर बोलतो

24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या अनेक दिवसांपासून तू फॉर्म मध्ये नव्हतास आणि तूझी बॅटही शांत होती त्यामुळे सगळीकडे तुझ्यावर टीका झाली. अनेक दिग्गज खेळाडूंनी तुला सपोर्ट केले तर अनेकांनी तुझ्याबद्दल बरे-वाईट बोलले. या काळात तु स्वतःला कस सावरलास

रविवारी पाकिस्तानविरुद्ध भारताच्या पराभवानंतर विराट कोहली पत्रकार परिषदेसाठी आला तेव्हा एका पत्रकाराने त्याला हा प्रश्न विचारला, मात्र जेव्हा कोहलीने त्याचे उत्तर दिले तेव्हा सगळेच अवाक झाले.

विराट म्हणाला, 'जेव्हा मी कसोटी कर्णधारपद सोडले तेव्हा मला फक्त एकाच व्यक्तीकडून मेसेज आला. ज्याच्यासोबत मी याआधी खेळलेलो आहे... तो म्हणजे एमएस धोनी. बर्‍याच लोकांकडे माझा नंबर आहे, म्हणजे... TV वर बरेच लोक सल्ले देतात, TV वर लोकांकडे बोलण्यासाठी खूप काही असते, पण ज्यांच्याकडे माझा नंबर आहे अशा इतर कोणांकडूनही मला दुसरा मेसेज आला नाही. म्हणून एखाद्या व्यक्तीबद्दल जो आदर असतो, मनातून जो खरा संबंध असतो तेव्हा तो अशा प्रकारे व्यक्त होतो. कारण दोन्ही बाजूंनी सिक्युरिटी असते. दोघांनाही एकमेकांकडून काही नको आहे. मलाही त्यांच्याकडून काहीही नको आहे आणि मी त्याच्याबरोबर कधीही इनसिक्योर नव्हतो आणि तो सुद्धा माझ्यासोबत कधीही इनसिक्योर नव्हता. मी एवढेच सांगेन की मला कोणाबद्दल काही बोलायचे असेल तर मी स्वतः त्याच्याशी बोलतो. जर तुम्हालाही कुणाला मदत करायची असेल तर. म्हणजे सगळ्या जगासमोर तुम्ही ज्या सूचना दिल्या तर त्याची किंमत माझ्यासाठी काहीच नाही. समजा त्या गोष्टी माझ्यासाठी असतील. माझ्यामध्ये सुधारणा करण्यासाठी असेल तर माझ्याशी येऊन बोला.'

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यामध्ये कोहली फॉर्ममध्ये परतला

विराट कोहलीने पाकिस्तानविरुद्ध शानदार फलंदाजी करत अवघ्या 44 चेंडूत 60 धावा केल्या. यादरम्यान त्याच्या बॅटमधून 4 चौकार आणि 1 षटकार आला. असे असूनही भारतीय संघाला या सामन्यात 5 विकेट्सनी पराभव पत्कारावा लागला.

पत्रकार परिषदमध्ये विराट काय म्हणाला. त्यावरून असे वाटते की तो फॉर्ममध्ये येण्याची वाट पाहत होता आणि त्याला त्याच्या मनातला राग बाहेर काढायचा होता. हा राग कोणावर होता? हे मात्र काही स्पष्ट झाले नाही.

आशिया कपमध्ये विराट कोहली जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. त्याने हाँगकाँग आणि पाकिस्तान या दोन्ही संघांविरुद्ध अर्धशतके झळकावली आहेत.
आशिया कपमध्ये विराट कोहली जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. त्याने हाँगकाँग आणि पाकिस्तान या दोन्ही संघांविरुद्ध अर्धशतके झळकावली आहेत.

कर्णधारपदावरून सौरव गांगुलीसोबत झाला होता वाद

भारताचा माजीकर्णधार आणि आता BCCI अध्यक्ष सौरव गांगुली यांचे एक वक्तव्य मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते ज्यावेळी विराटने वनडे आणि टी-20 चे कर्णधारपद सोडले होते. त्यावेळी दादांनी सांगितले होते, 'विराटला वनडे कर्णधारपदावरून हटवण्याचा निर्णय BCCI आणि निवड समितीने एकत्रितपणे घेतला आहे.

BCCI ने विराटला T-20 चे कर्णधारपद सोडू नये असे सांगितले होते, पण तो त्याला राजी नव्हता. त्यावेळी मर्यादित षटकांच्या फॉरमॅटमध्ये दोन वेगळे कर्णधार नसावेत, असे निवडकर्त्यांचे मत होते. त्यामुळेच हा निर्णय घेण्यात आला आहे’

त्याच वर्षी विराट कोहलीने तिन्ही फॉरमॅटचे कर्णधारपद सोडले.
त्याच वर्षी विराट कोहलीने तिन्ही फॉरमॅटचे कर्णधारपद सोडले.

विराटने BCCI ला ठरवलं खोटं

विराटने गांगुलीच्या या वक्तव्यावर भाष्य केले होते, तो म्हणाला, 'मी BCCI ला सांगितले होते की मला टी-20 चे कर्णधारपद सोडायचे आहे, ज्यावेळी मी हे केले त्यावेळी माझा हा मुद्दा बोर्डाला मान्य होता आणि ते आनंदाने यासाठी तयार झाले होते. ते या बाबतीत अगदी स्पष्ट होते आणि त्यावेळी कोणीही मला कर्णधारपदी राहण्यास सांगितले नाही. याउलट त्यांनी मला हा तूझा चांगला निर्णय आहे असे सांगीतले.

यानंतर गांगुलीने पुन्हा वक्तव्य केले आणि म्हटले होते , 'BCCI ने कोहलीवर कोणताही दबाव टाकला नाही. आम्ही त्याला कर्णधारपद सोडण्याबाबत काहीही सांगितले नाही. आम्ही असे काही करत नाही कारण मी देखील एक खेळाडू आहे आणि मला ते चांगले समजते. या सर्व वादानंतर विराटने 2022 च्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर कसोटी कर्णधारपदही सोडून दिले होते.

बातम्या आणखी आहेत...