आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • Virot Kahli, Raheet Sharma Along With 27 Players With 99 Crore Arrears; The Honorarium Of 19 Matches Was Also Stagnant

मानधन मिळेना:विराट काेहली, राेहित शर्मासह 27 खेळाडूंची 99 काेटींची थकबाकी; 19 सामन्यांचे मानधनही रखडले

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • बीसीसीआयने नाही दिले मानधन; 27 खेळाडूू करारबद्धच्या यादीत सहभागी
  • 2 कसाेटी, 9 वनडे, 8 टी-20 ची मॅच फी नाही दिली

आ‌र्थिकदृष्ट्या सर्वात श्रीमंत क्रिकेट मंडळ म्हणून भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची आेळख आहे. मात्र, याच बलाढ्य आणि श्रीमंत बीसीसीआयच्या दिरंगाईमुळे एेन काेराेनाने संकटात सापडलेल्या कर्णधार विराट काेहली, राेहित शर्मा, जसप्रीत बुमराहसह २७ खेळाडूंना माेठा फटका बसला आहे. करारबद्ध असलेल्या २७ खेळाडूंना अद्याप त्यांचे हक्काचे मानधन बीसीसीआयने दिले नाही. त्यामुळेच या श्रीमंत बाेर्डाकडे या २७ खेळाडूंची तब्बल ९९ काेटींची थकबाकी आहेे. याशिवाय याच खेळाडूंना मागील १९ सामन्यांतील मानधनही देण्यात आलेले नाही. त्यामुळे हे खेळाडू आर्थिकदृष्ट्या चांगलेच अडचणीत सापडले आहेत. डिसेंबरपासून बीसीसीआयकडील चीफ फायनान्शियल पदच रिक्त आहे.

टीम इंडियाचा कर्णधार विराट काेहली, राेहित, बुमराह यांच्यासह २७ खेळाडूंना मागील दहा महिन्यांपासून करारापाेटी मिळणारे पैसेच बीसीसीआयकडून मिळाले नाहीत. यामध्ये ग्रेडनुसार मिळणाऱ्या मानधनाचा समावेश आहे. ग्रेड एमधील सहभागी विराट काेहली, राेहित शर्मा, बुमराह यांना प्रत्येकी सात काेटी मिळतात. बीसीसीआयकडून वार्षिक मानधन ए, बी आणि सी ग्रेडसाठी अनुक्रमे ५, ३, १ काेटी अशा स्वरूपात मिळते. यासाठी ग्रेड एमध्ये ११, बीमध्ये ५ व सीमध्ये ८ खेेळाडूंचा समावेश आहे.

१५ काेटींचे मानधन मिळेना :

२७ खेळाडूंना डिसेंबर २०१९ नंतर झालेल्या २ कसाेटी, ९ वनडे व ८ टी-२० चे मानधन मिळाले नाही. एक कसाेटी १५ लाख, वनडे ६ लाख व टी-२० साठी ३ लाखांचे मानधन दिले जाते. त्यामुळे कसाेटीसाठी बाेर्डाकडे खेळाडूंची ४ काेटी २० लाख, वनडेचे ७ काेटी ५६ लाख व टी-२० चे ३ काेटी ३६ लाखांचे मानधन रखडलेे आहे.

फायनान्शियल अधिकाऱ्याचे पद रिक्त :

डिसेंबरपासून बीसीसीआयमधील चीफ फायनान्शियलचे पद रिक्त आहे. हे पद अद्याप भरण्यात आलेले नाही. त्यामुळे करारबद्ध खेळाडूंच्या मानधन आणि मॅच फी देण्याबाबत काेणत्याही प्रकारचा निर्णय घेण्यात आलेला नाही.

बातम्या आणखी आहेत...