आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयपीएल 2020:... अखेर व्हिवोने सोडले आयपीएल स्पर्धेचे प्रायोजकत्व, फ्रँचायझींना व्हिवोकडून दरवर्षी 20-20 कोटी रुपये मिळत होते

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • व्हिवो दरवर्षी बीसीसीआय बोर्डाला 440 कोटी रुपये देते

चिनी मोबाइल कंपनी व्हिवोने आयपीएलच्या यंदाच्या स्पर्धेचे प्रायोजकत्व रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र व्हिवो आणि बीसीसीआयकडून याबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही. व्हिवो दरवर्षी बोर्डाला ४४० कोटी रुपये देते. व्हिवो २०१७ पासून टायटल स्पॉन्सर आहे. व्हिवोसोबतचा करार २०२२ मध्ये संपणार होता. मात्र आता हा २०२३ पर्यंत वाढवला जाऊ शकतो.

रविवारी आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलसोबतच्या बैठकीत व्हिवोचा करार कायम ठेवण्याचा निर्णय झाला होता. दुसऱ्या दिवशी बैठकीत बहुतांश फ्रँचायझींनी यावर नाराजी व्यक्त केली होती. करार कायम ठेवण्याच्या निर्णयावर स्वदेशी जागरण मंचसह अनेकांनी टीका केली होती. दरम्यान, स्पॉन्सरशिपबाबत बोर्डाचे अध्यक्ष सौरव गांगुली व सचिव जय शहा यांनी कंपनीच्या प्रतिनिधींसोबत चर्चा केली. यंदा ही स्पर्धा १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबरदरम्यान यूएईत होत आहे. फ्रँचायझींना व्हिवोकडून दरवर्षी २०-२० कोटी रुपये मिळत होते.

बातम्या आणखी आहेत...