आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वनडे मालिका:वाॅर्नरचे शतक; ऑस्ट्रेलियाने उडवला इंग्लंडचा 3-0 ने धुव्वा, इंग्लंड संघावर 221 धावांनी मात

मेलबर्न9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सामनावीर ट्रेव्हिस हेड (१५२), मालिकावीर डेव्हिड वाॅर्नर (१०६) आणि अॅडम झम्पाने (४/३१) यजमान ऑस्ट्रेलिया संघाची घरच्या मैदानावर विजयी हॅटट्रिक साजरी केली. पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलिया संघाने आपली माेहीम कायम ठेवताना मंगळवारी वनडे मालिकेत इंग्लंडचा ३-० ने धुव्वा उडवला. ऑस्ट्रेलिया संघाने तिसऱ्या वनडेत २२१ धावांनी शानदार विजय संपादन केला. ऑस्ट्रेलियाने डिएलच्या नियमानुसार हा सामना जिंकला. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने ४८ षटकांत ५ बाद ३५५ धावा काढल्या. प्रत्युत्तरात इंग्लंड संघाने ३१.४ षटकांत अवघ्या १४२ धावांवर आपला गाशा गुंडाळला. संघाकडून जेसन राॅयने सर्वाधिक ३३ धावांची खेळी केली. इतर फलंदाज सपशेल अपयशी ठरले. ऑस्ट्रेलियाचे ट्रेव्हिस हेड सामनावीर आणि वाॅर्नर मालिकावीर पुरस्काराचे मानकरी ठरले. यासह यजमान ऑस्ट्रेलिया संघाने घरच्या मैदानावर आयाेजित तीन वनडे सामन्यांची मालिका ३-० ने निर्विवाद पणे आपल्या नावे केली.

ऑस्ट्रेलिया संघाकडून डेव्हिड वाॅर्नरने १ हजार ४४ दिवसांनंतर वनडेत शतक साजरे केले. त्याने आता सामन्यात १०६ धावांची खेळी केली. त्याने यापुर्वी शेवटचे वनडे शतक १४ जानेवारी २०२० मध्ये झळकावले हाेते.

बातम्या आणखी आहेत...