आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
पदार्पणाच्या कसोटी सामन्यात वॉशिंग्टन सुंदर (६२) आणि शार्दूल ठाकूर (६७) या भारताच्या युवा खेळाडूंच्या जाेडीने रविवारी आॅस्ट्रेलियाच्या ब्रिस्बेन मैदानावर लक्षवेधी कामगिरी केली. यजमान आॅस्ट्रेलिया संघाविरुद्ध चाैथ्या कसाेटीच्या दुसऱ्या डावात दोघांनी सातव्या गड्यासाठी १२३ धावांची भागीदारी केली. भारतीय संघाने आता रविवारी पहिल्या डावात ३३६ धावा उभारल्या. वाॅशिंग्टन सुंदरने सरस खेळी करताना पदार्पणात ५० पेक्षा अधिक धावा आणि ३ पेक्षा अधिक बळी घेतले. अशा प्रकारची कामगिरी करणारा ताे आता दुसरा भारतीय खेळाडू ठरला. यापूर्वी १९४७ मध्ये दत्तू पडकरने ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिडनीच्या मैदानावर अशाच प्रकारची उल्लेखनिय कामगिरी पदार्पणात केली होती. तिसऱ्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात बिनबाद २१ धावा काढल्या. यजमान संघाकडे ५४ धावांची आघाडी झाली.
सुंदरची सलामीवीर म्हणून प्रथम श्रेणीत सुरुवात : तामिळनाडूकडून खेळणाऱ्या सुंदरने २०१६ मध्ये पहिल्यांदा प्रथम श्रेणी सामना खेळला. तेव्हा तो सलामीवीर म्हणून मैदानात उतरला. त्याला गोलंदाजी मिळाली नव्हती. त्याने अखेरचा प्रथम श्रेणी सामना २०१७ मध्ये खेळला. त्याने २०१६ मध्ये १९ वर्षांखालील विश्वचषकात सलामीवीर म्हणून भूमिका बजावली होती. त्यानंतर आता ताे आॅस्ट्रेलिया दाैऱ्यातील कसाेटी सामन्यात लक्षवेधी कामगिरी करत आहे. दुसऱ्या डावातील खेळीने त्याच्यावर अनेक माजी खेळाडूंनी काैतुकाचा वर्षाव केला.
आता 1986 च्या विक्रमाच्या पुनरावृत्तीचे आव्हान : आता कसोटी बरोबरीत राखण्याच्या १९८६ च्या विक्रमाची पुनरावृत्ती करण्याचे भारतीय संघासमोर आव्हान असेल. भारतीय संघाने हा सामना बरोबरीत राखल्यास, संघ ऑस्ट्रेलियामध्ये सलग दुसऱ्या मालिकेतील पराभव टाळेल. २०१८ मध्ये संघाने २-१ ने विजय मिळवला होता. अखेरच्या वेळी १९८६ मध्ये संघ सलग दोन मालिकांत अपराजित राहिला होता. ऑस्ट्रेलियात दोन्ही संघांतील ही १३ वी कसोटी मालिका आहे. ऑस्ट्रेलियाने ८ कसोटी जिंकल्या.
संुदर व शार्दूलची शतकी भागीदारी
वाॅशिंग्टन संुदर आणि शार्दूल ठाकूरने तुफानी खेळी करताना शतकी भागीदारी रचली. ही या मैदानावर संघाकडून सातव्या गड्यासाठी सर्वात मोठी भागीदारी ठरली. १८६ धावांवर ६ गडी परतल्यानंतर भारताचा डाव लवकर संपेल असे वाटत होते. मात्र, सुंदर व शार्दूलने संघाचा डाव सांभाळला. या मैदानावर ३७ वर्षांनी ७ व ८ क्रमांकाच्या फलंदाजांनी ५० पेक्षा अधिक धावा काढल्या. हेजलवूडने ५ बळी घेतले. ३६ वर्षांनी संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध सलग तिसऱ्या डावात १०० पेक्षा अधिक षटके खेळून काढली. संघ दुखापतीने त्रस्त झाला. त्यामुळे गोलंदाजीवर परिणाम झाला. मात्र, फलंदाजांनी जोरदार संघर्ष केला. सिडनी कसोटीत पहिल्या डावात भारताने पहिल्यांदा १००.४ व दुसऱ्या डावात १३१ षटके खेळली. आता ब्रिस्बेन कसोटीत पहिल्या डावात १११.४ षटके खेळ खेळली.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.