आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारत आणि श्रीलंका यांच्यात पुण्यात झालेल्या दुसऱ्या T-20 सामन्यात अक्षर पटेलने 31 चेंडूत 65 धावांची धडाकेबाज खेळी केली. त्याच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. दरम्यान, माजी क्रिकेटर वसीम जाफरने यावर मोठे वक्तव्य केले आहे.
तो म्हणतो की टीम इंडिया आता स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजाला कोणत्याही किंमतीत मिस करणार नाही. विशेष म्हणजे वसीम जाफरचे हे वक्तव्य अक्षर पटेलच्या उत्कृष्ट कामगिरीनंतर आले आहे.
अक्षरची धडाकेबाज खेळी
207 धावांचा पाठलाग करताना हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया 16 धावांनी पराभूत झाला. मात्र पराभवाला सामोरे जावे लागले तरी अष्टपैलू अक्षर पटेलचा धडाकेबाज खेळ भारतीय चाहत्यांना नक्कीच समरणात राहिल यात शंका नाही.
ज्याने टीम इंडियाला विजयाच्या उंबरठ्यावर आणले होते. मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियानेअवघ्या 57 धावांवर पाच विकेट गमावल्या होत्या. अक्षरने (65) सूर्यकुमार यादव (51) सोबत 91 धावांची भागीदारी केली आणि सामन्यात नवसंजीवनी दिली. मात्र, त्याचे प्रयत्न निष्फळ ठरले आणि श्रीलंकेने पुनरागमन केल्याने टीम इंडिया 190/8 वर थांबली.
काय अक्षर घेऊ शकतो जडेजाची जागा ?
खरं तर रवींद्र जडेजा आशिया कप 2022 पासून गायब आहे. या सामन्यात दोन विकेट्स घेणाऱ्या अक्षर पटेलला त्याच्या असामान्य कामगिरीबद्दल चाहत्यांकडून आणि माजी क्रिकेटपटूंकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
दरम्यान, भारताचा माजी फलंदाज वसीम जाफर म्हणाला की अक्षरने अशीच कामगिरी करत राहिल्यास दुखापतीमुळे आशिया चषक 2022 मधून बाहेर पडलेल्या स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजाची जागा तो सहजपणे भरू शकतो.
जडेजा बराच काळ संघाबाहेर
तो म्हणाला, 'तिन्ही फॉरमॅटमध्ये उत्कृष्ट खेळाडू असलेल्या जडेजाची भारताला नक्कीच उणीव भासते. मात्र जेव्हापासून अक्षर पटेल संघात आला आहे. जडेजा बराच काळ बाहेर असल्याने आम्ही त्याच्याबद्दल जास्त बोलत नाही. यावरून अक्षर क्रिकेटपटू म्हणून किती चांगला आहे हे दिसून येते.
तो जबरदस्त आहे... तो असेही म्हणाला की अक्षर सध्या भारताचा नंबर 1 फिरकी अष्टपैलू खेळाडू आहे. भारत भाग्यवान आहे की त्यांना जडेजाच्या जागी अक्षर पटेलच्या रूपाने संधी मिळाली आहे. त्याचाही जास्तीत जास्त फायदा तो फॉरमॅटमध्ये घेत आहेत.
जडेजाला आवडत नसलेल्या पॉवरप्लेमध्ये तो गोलंदाजी करू शकतो आणि जर त्याने अशी फलंदाजी केली तर तो त्याची जागा नक्की घेऊ शकतो यात शंका नाही असे जाफरने ईएसपीएन क्रिकइन्फोशी संवाद साधताना म्हटले आहे
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.