आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • When Divya Marathi Called To Congratulate Shahbaz's Father, He Learned That His Son Had Been Selected

भारतीय संघात शाहबाज अहमदची निवड:दिव्य मराठी प्रतिनिधीने अभिनंदनासाठी वडिलांशी संपर्क केला, म्हणाले- तुमच्याकडून बातमी कळाली

मेवात राजकिशोर ​​​​​​​3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

हरियाणाचा अष्टपैलू खेळाडू शाहबाज अहमद 18 ऑगस्टपासून झिम्बाब्वेविरुद्ध सुरू होणाऱ्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत टीम इंडियाचा भाग असणार आहे. शाहबाजची या सामन्यासाठी निवड झालेली आहे. त्याची वॉशिंग्टन सुंदरच्या जागी संघात निवड करण्यात आलेली आहे. दुखापतीमुळे सुंदर या मालिकेतून बाहेर पडला. त्यामुळे शाहबाजला आपला खेळ दाखविण्याची सुवर्णसंधी मिळालेली आहे.

भारतीय संघाते जेव्हा निवड झाल्याची माहिती मिळताच दिव्य मराठीने शाहबाज यांच्या वडिलांशी फोन करून अभिनंदन केले. तेव्हा वडिल अहमद जान म्हणाले की, माझ्या मुलाची भारतीय संघात निवड झाल्याची माहिती मला तुमच्याकडून मिळाली आहे. शाहबाजच्या दहा वर्षांच्या मेहनतीला फळ आले असून चाहत्यांची प्रार्थना आणि अल्लाहच्या कृपेने हे सर्व घडले आहे. अशी भावना अहमद जान यांनी दिव्य मराठीशी बोलताना व्यक्त केली.

अहमद जान यांच्या सांगण्यावरून शाहबाज सध्या कोलकात्यात आहे. तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये बंगाल टीमकडून खेळतो आणि सध्या संघाच्या शिबिराचा तो भाग आहे. शाहबाजचे वडील म्हणाले - एकेकाळी शाहबाजने सिव्हिल इंजिनिअर पूर्ण करावी, अशी माझी इच्छा होती. मेवातमध्ये शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याने फरिदाबादच्या मानव रचना आंतरराष्ट्रीय विद्यापीठात प्रवेश घेतला. जेणेकरून तो अभियंता बनू शकेल. शाहबाजला तीन वर्षांची पदवी पूर्ण करण्यासाठी तब्बल अकरा वर्ष लागली.

क्लास सोडून क्रिकेट खेळायला जायचा
अहमद जान पुढे बोलताना म्हणाले की, फरीदाबादमध्ये असताना त्याचे मन कधी अभियांत्रिकीच्या अभ्यासात गुंतलेले नव्हते. हे आम्हा कोणाला माहितही नव्हते. तो क्रिकेटसाठी क्लास सोडून जायचा. शहाबाज क्लासला येत नसल्याची माहिती आम्हाला विद्यापीठाकडून देण्यात आली. तेव्हा हा सर्व प्रकार समोर आला.

क्रिकेट, अभ्यासात क्रिकेटची निवड केली
अहमद जान म्हणाले, या परिस्थितीत मी शाहबाजला सांगितले की, अभ्यास किंवा क्रिकेट यापैकी एकाचीच निवड करावी लागेल. पण जे निवड करशील त्यात पूर्ण लक्ष केंद्रीत करावे लागेल. त्यानंतर शाहबाजने क्रिकेटची निवड केली आणि त्यावर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला. यानंतर तो गुडगावमधील क्रिकेट अकादमीत जाऊ लागला. तिथे प्रशिक्षक मन्सूर अली यांनी त्याला प्रशिक्षण दिले.

उद्या संघात सामील होऊ शकतो

शाहबाज अहमद उद्या म्हणजेच 17 ऑगस्टला संघात सामील होऊ शकतो. भारतीय संघाला झिम्बाब्वेविरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका खेळायची आहे. पहिली वनडे 18 ऑगस्ट, दुसरी 20 आणि तिसरी 22 ऑगस्टला होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...