आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • PAK Vs AFG Asia Cup 2022 High Voltage Drama Video Footage, When Farid Intervened, Asif Ali Ran At Him With The Bat: The Argument Escalated To A Scuffle; Asif Was Dismissed On Farid's Second Ball After Hitting A Six

फरीदने डिवचल्यावर आसिफ अली बॅट घेऊन अंगावर धावला:वाद शिगेला; फरीदच्या दुसऱ्या चेंडूवर बाद झाला होता आसिफ

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आशिया चषकाच्या सुपर फोर सामन्यात बुधवारी रात्री पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. या सामन्यात रोमांच आणि आक्रमकता यांचा समसमान प्रकार पहायला मिळाला.

शारजाच्या मैदानावर पाकिस्तानचा पॉवर हिटर आसिफ अली आणि अफगाणिस्तानचा गोलंदाज फरीद अहमद यांच्यात बाचाबाची झाली. हे प्रकरण इतके वाढले की, फरीदला मारण्यासाठी आसिफने शेवटी बॅटही उगारली. मात्र, खेळाडू आणि पंचांनी हस्तक्षेप करून प्रकरण शांत केले.

पण, झालेला हा प्रकार तमाम क्रिकेट जगतातील चाहत्यांनी लाइव्ह पाहिला आणि त्यामुळे पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या या संघर्षावर साऱ्या क्रिकेट विश्वात थू थू झाली.

पाक-अफगाण सामना रोमहर्षक उंचीवर सुरू होता. पाकिस्तानच्या आठ विकेट्स पडल्या होत्या. त्याला विजयासाठी शेवटच्या 10 चेंडूत 20 धावा करायच्या होत्या, तर अफगाणिस्तानला फक्त 2 विकेट्स हव्या होत्या.

अशा परिस्थितीत 19 वे षटक फरीद अहमदकडे आले

पहिल्या चेंडूवर आसिफने एक धाव घेत हरिस रौफला स्ट्राईक दिली. फरीदच्या दुसऱ्या चेंडूवर रौफ बोल्ड झाला आणि तिसऱ्या चेंडूवर फलंदाजीसाठी आलेल्या नवीन खेळाडू नसीम शाहने सिंगल घेत आसिफला स्ट्राइक दिली. पुढच्याच चेंडूवर आसिफने सुरेख षटकार ठोकला. मात्र त्याच्या पुढच्या चेंडूवर आसिफने धावगती वाढवण्याच्या नादात मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला आणि तो झेलबाद झाला. अशा परिस्थितीत आसिफ आउट झाल्याचा आनंद साजरा करताना फरीदने आसिफला डिवचले. याचाच राग आसिफला आल्याने फरीद आणि आसिफमध्ये बाचाबाची झाली. दोघांतील वाद हा एवढा वाढला की असिफने तर फरीदला मारण्यासाठी बॅट उचलली होती.त्यावेळी मैदानावरील पंच आणि इतर खेळाडूंनी मध्यस्थी करून हे प्रकरण शांत केले.

नसीम शाहने 2 षटकार मारून मिळवला विजय

आसिफ बाद झाल्यानंतर पाकिस्तानच्या आशा जवळपास संपुष्टात आल्या होत्या. पण, शेवटचा फलंदाज म्हणून खेळायला आलेल्या नसीम शाहने 2 चेंडूत 2 षटकार ठोकत संघाला विजय मिळवून दिला.

पाकिच्या विजयामुळे टीम इंडिया अंतिम फेरीच्या शर्यतीतून बाहेर

अफगाणिस्तानच्या पराभवाचा फटका आणि पाकच्या विजयाचा परिणाम टीम इंडियावरही झाला आहे. भारतीय संघ सुपर-4 मध्ये सलग दोन सामने हरला आहे.

अशा स्थितीत रनरेटचे एकच समीकरण शिल्लक होते, पण पाकिस्तानच्या विजयामुळे तोही संपला आणि टीम इंडिया आता अंतिम फेरीच्या शर्यतीतून पूर्णपणे बाहेर पडली आहे. आशिया कप 2022 चा अंतिम सामना आता 11 सप्टेंबर रोजी पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात होणार आहे.

आशिया कप २०२२ मध्ये बाबर आझमला एकही अर्धशतक झळकावता आलेले नाही.
आशिया कप २०२२ मध्ये बाबर आझमला एकही अर्धशतक झळकावता आलेले नाही.

पाकिस्तानी दिग्गज संतापला

फरिद आणि आसिफच्या वादानंतर पाकिस्तानचे दिग्गज खेळाडू आपल्या खेळाडूंच्या समर्थनार्थ पुढे आले आहे

शोएब अख्तर म्हणाला- उद्धटपणा खपवून घेतला जाणार नाही

तो म्हणते एक देश म्हणून आम्ही तुमची नेहमीच काळजी घेत आलो आहोत. वाईट काळात आम्ही नेहमीच तुमची साथ देतो आणि तुम्ही आमच्याशी वाईट वागता. तुम्ही खेळा, जिंका... काहीही करा, मात्र आमच्यासोबत उद्धटपणाने वागू नका. कारण उद्धटपणा खपवून घेतला जाणार नाही.

वसीमला आली जावेद मियांदादची आठवण

सामना जिंकल्यानंतर वसीम अक्रमने लिहिले - हा एक चांगला सामना होता. इतका सेनसेंशनल सामना मी कधीच पाहिला नाही. नसीम शाहचा किती शानदार सिक्सर लगावले. मला तर जावेद मियांदादने ज्यावेळी आम्हाला षटकार मारून विजय मिळवून दिला त्याची आठवण झाली. त्यावेळी मी त्या विजेच्या संघाचा भाग होतो.

बातम्या आणखी आहेत...