आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • Asia Cup 2022 India Vs Pakistan Super Four Match; Harbhajan Singh Defend Arshdeep Singh, Rohit Sharma, Virat Kohli, Mohammad Rizwan, Asif Ali, Wikipedia Links Arshdeep To Khalistan, Govt Sends Notice To Wikipedia Officials, Says – Cricketer's Family May Be At Risk

विकिपीडियाकडून अर्शदीपचा संबंध खलिस्तानशी:सरकारची विकिपीडिया अधिकाऱ्यांना नोटीस, म्हणाले- अर्शदीपच्या कुटुंबाला धोका

25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

विकिपीडियावर भारतीय वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगचे नाव खलिस्तानशी जोडल्याप्रकरणी भारत सरकारने कठोर पावले उचलली आहेत. त्यांनी यासंदर्भात विकिपीडियाच्या अधिकाऱ्यांना नोटीसही बजावले आहे. तर यावर आयटी मंत्रालयाने म्हटले आहे की, 'हे अर्शदीपच्या कुटुंबियांसाठी धोक्याचे ठरू शकते. तसेच देशातील वातावरणही बिघडू शकते.

आशिया कपमधील भारत-पाकिस्तान सामन्यात अर्शदीपने कॅच सोडल्यापासून सोशल मीडियावर त्याला ट्रोल केले जात आहे. एका सामाजिक कार्यकर्त्याने अर्शदीपचे खलिस्तानीशी संबंध जोडण्याचा कट हा कट पाकिस्तानच्या अकाउंटसमधून रचला जात असल्याचे सांगितले. या सामाजिक कार्यकर्त्याने अशा 8 खात्यांचे तपशील देखील पोस्ट केली होती.

विकीपीडीयामध्ये भारताऐवजी लिहिले खलिस्तान

पाकिस्तानच्या विजयानंतर, अर्शदीपला विकिपीडियाच्या प्रोफाइलमध्ये पाकिस्तानी चाहत्यांनी 2018 च्या अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये खलिस्तानी संघाचा भाग असल्याचे दाखविले होते. यानंतर भारतीयांच्या नावाने अकाउंट तयार करून त्याला खलिस्तानी संबोधून ट्रोल करण्यास सुरुवात केली. अर्शदीप भारताच्या अंडर-19 वर्ल्ड चॅम्पियन संघाचा भाग होता.

अर्शने आसिफचा सोडला होता कॅच

आशिया चषकाच्या सुपर 4 च्या सामन्यात रविवारी पाकिस्तानने भारताचा 5 विकेट्सने पराभव केला. सामन्यात अर्शदीप सिंगने 18व्या षटकात आसिफ अलीचा सोपा कॅच सोडला. यानंतर आसिफने 8 चेंडूत 16 धावा करत पाकिस्तानला विजय मिळवून दिला. रवी बिश्नोईच्या चेंडूवर आसिफचा कॅच सुटला तेव्हा त्याने एकही धावा काढल्या नव्हत्या..

भज्जी अर्शदीपच्या समर्थनार्थ उतरला

माजी दिग्गज स्पिनर हरभजन सिंगने युवा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगचा बचाव करताना लिहिले - 'अर्शदीप सिंगला दोष देणे थांबवा, कोणीही जाणूनबुजून कॅच सोडत नाही. पाकिस्तानने चांगला खेळ खेळला आहे. काही लोक सोशल मीडियावर आपल्या टीम आणि अर्शदीपबद्दल वाईट बोलत आहेत हे लज्जास्पद आहे. अर्शदीप खरा सोना आहे.

अर्शदीपच्या चुकीमुळे कर्णधार रोहित संतापला होता

रवी बिश्नोई पाकिस्तानच्या सामन्यात भारताचा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरत होता. लेगस्पिनर बिश्नोई आपल्या गोलंदाजीतून पाकिस्तानला अडचणीत आणत होता. अशा परिस्थितीत कर्णधार रोहितनेही 18व्या षटकाची जबाबदारी बिश्नोईकडे सोपवली, पण या षटकात अर्शदीपच्या एका चुकीमुळे कर्णधार इतका संतापला की तो मैदानावरच त्याच्यावर ओरडला.

बिश्नोईने पहिल्या दोन चेंडूत फक्त दोन धावा दिल्या. ओव्हरच्या तिसऱ्या चेंडूवर आसिफ अलीने स्लॉग शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू बॅटच्या काठाला लागला आणि वर गेला. अर्शदीप तो कॅच सहज घेईल असे सर्वांनाच वाटत होते.मात्र, तसे झाले नाही आणि हातात आलेला चेंडू खाली पडला.

जेव्हा सामना हा अटीतटीच्या काठावर असताना एवढा महत्त्वाचा कॅच सुटला हे पाहून कर्णधार रोहितला आपल्या रागावर नियंत्रन ठेवता आले नाही आणि तो मैदानावरच हर्षदीपवर मोठ्याने ओरडला, रोहितचा राग त्यावेळी त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसून येत होता.

अर्शदीपने चांगली गोलंदाजी केली पण कॅच सोडला.

या सामन्यात 23 वर्षीय वेगवान गोलंदाज अर्शदीपने प्रभावी गोलंदाजी केली. त्याने 3.5 षटकांमध्ये 27 धावांत एक बळी घेतला. तर, रवी बिश्नोईने 4 षटकात 26 धावा देत एक विकेट घेतली आणि अनुभवी भुवनेश्वर, पंड्या आणि चहलने 40 हून अधिक धावा दिल्या.

बातम्या आणखी आहेत...