आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापॅट कमिन्सच्या (५/४२) शानदार खेळीच्या बळावर यजमान ऑस्ट्रेलिया संघाने घरच्या मैदानावर पाहुण्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसाेटी मालिकेत दुसऱ्याच दिवशी विजयी सलामी दिली. ऑस्ट्रेलियाने दुसऱ्याच दिवशी रविवारी दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला. ऑस्ट्रेलियाने ६ गड्यांनी विजय संपादन केला. यासह ऑस्ट्रेलिया संघाने तीन कसाेटी सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडी घेतली. येत्या २६ डिसेंबरपासून दुुसऱ्या कसाेटीला सुरवात हाेणार आहे. ऑस्ट्रेलिया संघाने २०१८ नंतर कसाेटीत दक्षिण आफ्रिकेवर शानदार विजय मिळवला. पॅट कमिन्स, मिशेल स्टार्क (२/२६), बाेलंड (२/१४) आणि नॅथनने (१/१७) दुसऱ्या डावात दक्षिण आफ्रिका संघाला ९९ धावांवर राेखले. यातून ऑस्ट्रेलिया संघाने आवाक्यातले ३४ धावांचे टार्गेट ७.५ षटकांत चार गड्यांच्या माेबदल्यात गाठले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.