आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IND vs SA:अरुण जेटली स्टेडियमवर चाहते भिडले एकमेकांशी, लाथा-बुक्यांनी झाली तुफान हाणामारी, पोलिसांचा हस्तक्षेप, व्हिडिओ व्हायरल

19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिल्लीत खेळल्या गेलेल्या भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका या सामन्यादरम्यान अरुण जेटली स्टेडियमच्या ईस्ट स्टँडमध्ये बसलेले काही प्रेक्षक एकमेकांशी भिडले. यावेळी दोन्ही बाजूंनी लाथा-बुक्क्यांची जोरदार हाणामारी झालेली पाहायला मिळाली

प्रकरण वाढत असल्याचे पाहून पोलिसांनी धाव घेत प्रकरण शांत केले. या भांडणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.

व्हिडिओच्या सुरुवातीला दोन चाहते एका मुलाला मारहाण करत असल्याचे दिसत आहे, मात्र काही वेळाने आणखी दोन चाहते आले आणि त्याच मुलावर लाथा-बुक्यांनी मारायला सुरुवात केली. मात्र या हाणामारीमागचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.

असे असले तरी त्यातील एक व्यक्ती खूपच उत्साहित असल्याचे सांगितले जात आहे. मॅच पाहण्यासाठी तो पहिल्यांदाच स्टेडियममध्ये आला असावा. आणि त्याने भारताचा मोठा ध्वजही त्याने हातात घेतला होता. त्यामुळे चाहत्यांना मैदानावरील दृष्य पाहण्यासाठी वारंवार समस्या येत असाव्यात.

त्यामुळे मागील सिटवरील लोकांनी त्याला खाली बसायला सांगीतले आणि त्याच्यांमध्ये वाद झाला. फ्लॅग मॅनने मागच्या स्टँडवरून आणखी लोकांना बोलावले आणि पुढे त्या वादाचे हाणामारीत रुपांतर झाल्याचे पाहता येते.

बातम्या आणखी आहेत...