आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी ॲनालिसिस:घरच्या मैदानावर आयपीएल सामने नसल्याने विजयाचे गणित अडचणीत

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
पंजाबचा कर्णधार राहुल चांगल्या कामगिरीसाठी प्रयत्नशील असेल. - Divya Marathi
पंजाबचा कर्णधार राहुल चांगल्या कामगिरीसाठी प्रयत्नशील असेल.
  • चेन्नईचे 10 सामने फ्लॅट पिचवर; कोलकाता टीमसाठी फायदेशीर

यंदाच्या १४ व्या सत्रातील आयपीएल स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. ९ एप्रिलपासून स्पर्धेला सुरुवात हाेणार आहे. यंदा प्रथमच सहभागी संघांचे सामने आपल्या घरच्या मैदानावर हाेणार नाहीत. त्यामुळेच या संघांचे स्पर्धेतील विजयाचे गणित अडचणीत सापडले. कारण ८ फिरकीपटू असलेल्या चेन्नई संघाचे दहा सामने हे पाटा कोलकाता हाेतील. मात्र, अशीच खेळपट्टी कोलकाता नाइट रायडर्स संघासाठी अधिक फायदेशीर ठरणारी आहे.

चेन्नई सुपरकिंग्ज : टीमकडे ८ फिरकीपटूंचा पर्याय आहे. संघाने लिलावात माेईन व के. गाैतमसाेबत करार केला. चेन्नईच्या १० मॅच मुंबई, बंगळुरू व कोलकात्याच्या पाटा पिचवर हाेतील. येथे चेंडू बाउन्स हाेताेे. त्यामुळे विजय अवघड आहे.

राजस्थान : संघाचे दहा सामने हाय-स्काेअरिंगच्या मुंबई, कोलकाता, बंगळुरूतील पिचवर हाेतील. हे टीमच्या फलंदाजांसाठी फायदेशीर आहे. बेन स्टोक्स व शिवम दुबेच्या रूपाने संघात वेगवान गाेलंदाज आहेत.

मुंबई इंडियन्स : वानखेडेची पिच वेगवान गोलंदाजांसाठी फायदेशीर. त्यामुळे मुंबईला तीन विदेशी वेगवान गोलंदाज खेळवण्याचा पर्याय आहे. मात्र, टीमला चेन्नई, अहमदाबादमध्ये खेळावे लागणार आहे.

हैदराबाद : सुरुवातीचे ९ सामने फिरकीला मदतगार असलेल्या चेन्नई व दिल्लीतील मैदानावर हाेतील. तसेच या टीमचे घरचे मैदानही फिरकीसाठी फायदेशीर आहे. हैदराबादकडे राशिद, नबी व शाहबाज नदीमच्या रूपात चांगले फिरकीपटूही आहेत.

कोलकाता : संघ मुंबई, बंगळुरू,अहमदाबाद-चेन्नई प्रत्येकी सात सामने खेळणार आहे. दोन्ही पिचवर सरस खेळी करणारे खेळाडू संघात आहेत. यात फर्ग्युसन, कमिन्स, शिवम व नागरकोटी, कुलदीप, नरेन व शाकिब हे सरस गोलंदाज आहेत.

दिल्ली : संघाचे सुरुवातीचे तीन सामने मुंबईत, त्यानंतरचे सामने चेन्नई, अहमदाबादेत हाेणार. कर्णधार अय्यर, पृथ्वी, रहाणेला मुंबईत खेळल्याचा अनुभव आहे. अहमदाबाद व चेन्नईची पिच स्पिनरला फायदेशीर असल्याने अक्षर-अश्विन यशस्वी ठरतील.

बंगळुरू : चिन्नास्वामी आयपीएलचे हाय-स्काेअरिंग मैदान आहे. यामुळे लिलावात टीमने स्फाेटक फलंदाज मॅक्सवेलसह वेगवान गोलंदाज जेमिसन व क्रिश्चियनला खरेदी केले. या संघाचे सात सामने चेन्नई व अहमदाबादच्या संथ पिचवर हाेणार आहेत.

पंजाब किंग्ज : राहुलच्या नेतृत्वात पंजाब बंगळुरूत ५ मॅच खेळेल. राहुल, मयंक कर्नाटकसाठी घरच्या मैदानावर खेळतात. गेल, मनदीप,, सरफराज, जॉर्डन बंगळुरूकडून खेळलेले आहे. ते पुन्हा येथे खेळतील.

बातम्या आणखी आहेत...