आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • Women's Asia Cup Schedule Announced: India Pakistan Women's Teams To Face Each Other On October 7; The Tournament Starts In Bangladesh From October 1

महिला आशिया कप स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर:भारत-पाकिस्तान सामना 7 ऑक्टोबरला, 1 ऑक्टोबरपासून स्पर्धेला सुरुवात

6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बांग्लादेशमध्ये 1 ऑक्टोबरपासून होणाऱ्या महिला आशिया कप स्पर्धेसाठी बुधवारी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली. BCCI ने संघाची कमान हरमनप्रीतकडे सोपवली आहे. तर स्मृती मंधानाला उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली.

टीम इंडिया सध्या इंग्लंड दौऱ्यावर असून, बुधवारी ते इंग्लंडविरुद्ध दुसरी वनडे खेळणार आहेत. पहिला सामना टीम इंडियाने 7 विकेटने जिंकला. तीन सामन्यांच्या सिरीजमध्ये संघ 1-0 ने आघाडीवर आहे.

7 संघ सहभागी होणार

आशिया कपचा अंतिम सामना 15 ऑक्टोबरला होणार आहे. यामध्ये भारत, पाकिस्तान, बांग्लादेश (यजमान), श्रीलंका, संयुक्त अरब अमिराती (UAE), थायलंड आणि मलेशिया यांचा समावेश आहे. अफगाणिस्तान संघ येणार नाही. कारण तालिबान सत्तेत आल्यापासून तिथे एकही महिला संघ नाही.

बांग्लादेश गतविजेता आहे.
बांग्लादेश गतविजेता आहे.

संघ 10 दिवसांत 6 सामने खेळणार आहे

भारतीय संघ 1 ऑक्टोबरला श्रीलंकेविरुद्ध आपल्या पहिल्या सामन्याला सुरुवात करेल. त्यानंतर सलग दोन दिवस संघ मलेशिया (3 ऑक्टोबर) आणि UAE (4 ऑक्टोबर) यांच्याशी सामना करेल. टीम इंडिया 8 ऑक्टोबरला यजमान बांग्लादेश आणि 10 ऑक्टोबरला थायलंडशी भिडणार आहे. हरमनप्रीतची टीम इंडिया 10 दिवसांत सहा लीग मॅच खेळणार आहे.

राऊंड रॉबिनच्या आधारे सामने खेळले जातील

ही स्पर्धा राऊंड रॉबिन पद्धतीने खेळवली जाईल. सर्व संघांना एकमेकांना सामोरे जावे लागेल. अव्वल 4 संघ उपांत्य फेरीत पोहोचतील. पहिली स्पर्धा राऊंड रॉबिन पद्धतीने खेळवली जाईल. उपांत्य फेरीचे सामने 11 आणि 13 ऑक्टोबरला होतील. तर अंतिम सामना 15 ऑक्टोबरला होईल.

टीम इंडियाचा महिला संघ

हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना(उपकर्णधार) दीप्ती शर्मा, शेफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्स, सभिनेनी मेघना, रिचा घोष, स्नेह राणा, दयालन हेमलता, मेघना सिंग, रेणुका ठाकूर, पूजा वस्त्राकर, राजेश्वरी गायकवाड, राधा यादव, के.

स्टँड बाय: तानिया भाटिया, सिमरन दिल बहादूर.

श्रीलंकेने जिंकला पुरुषांचा आशिया कप

11 सप्टेंबर रोजी श्रीलंकेने पुरुषांच्या आशिया कपचे विजेतेपद पटकावले. त्यांनी पाकिस्तानचा 23 धावांनी पराभव करत सहाव्यांदा ही स्पर्धा जिंकली. पुरुषांची आशिया कप स्पर्धा श्रीलंकेच्या यजमानपदी UAE मध्ये झाली. देशातील राजकीय गोंधळामुळे ते UAEला हलवण्यात आली होती

बातम्या आणखी आहेत...