आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वनडे सामन्यांची मालिका:महिला क्रिकेट : भारत-श्रीलंका मालिकेचे नाही होणार थेट प्रक्षेपण

मुंबई7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

यजमान श्रीलंका आणि भारतीय महिला संघातील तीन वनडे सामन्यांच्या मालिकेला उद्या गुरुवारपासून सुरुवात होणार आहे. यानंतर १ ते ७ जुलैदरम्यान हे दोन्ही संघ तीन वनडे सामन्यांच्या मालिकेत समोरासमोर असतील. या दोन्ही मालिकेतील सामन्यांचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार नाही. भारतीय महिला संघ वर्ल्डकपनंतर पहिल्यांदाच मालिका खेळणार आहे. यासाठी खास श्रीलंका दौऱ्याचे आयोजन करण्यात आले. भारत आणि श्रीलंका यांच्यात गुरुवारी सलामीचा टी-२० सामना रंगणार आहे. त्यानंतर २५ व २७ जुन रोजी अनुक्रमे दुसरा आणि तिसरा सामना आयोजित करण्यात आला. रनगिरी दाम्बुला इंटरनॅशनल स्टेडियमवर टी-२० मालिकेतील सामने आयोजित करण्यात आले. त्यानंतर हे दोन्ही संघ १ जुलैला सलामीच्या वनडे सामन्यात समोरासमोर असतील. तसेच ४ जुलैला दुसरा आणि ७ जुलैला तिसरा वनडे सामना होणार आहे. हे सामने पल्लेकल येथे आयोजित करण्यात आले आहेत.

बातम्या आणखी आहेत...