आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • Women's Cricket To Win World Title Today; Australia Is A Strong Contender For Good Average |marathi News

दिव्य मराठी इन्फोग्राफिक:आज महिला क्रिकेटला मिळणार विश्वविजेता; चांगल्या सरासरीमुळे ऑस्ट्रेलिया प्रबळ दावेदार

ख्राइस्ट चर्च4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ऑस्ट्रेलिया-इंग्लंडचा सामना सकाळी 6.30 वा.

क्रिकेटचे पारंपरिक प्रतिस्पर्धी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात महिला विश्वचषक विजेतेपदाचा सामना रविवारी रंगणार आहे. ऑस्ट्रेलिया ६ विजेतेपदांसह सर्वाधिक यशस्वी आहे तर इंग्लंड गतविजेता आहे आणि त्याच्या नावावर चार विजेतेपद आहेत. ३४ वर्षांनंतर प्रथमच आयसीसी विश्वचषक फायनलमध्ये ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड आमनेसामने येणार आहेत. ऑस्ट्रेलिया जेतेपदासाठी प्रबळ दावेदार असल्याचे दिसत आहे, कारण त्यांनी त्यांचे सर्व ८ सामने जिंकले आहेत. त्यांची फलंदाजी सरासरी इंग्लंडपेक्षा चांगली आहे. अव्वल ४ सर्वाधिक धावा करणाऱ्यांमध्ये ऑस्ट्रेलियाचे ४ खेळाडू आहेत. दुसरीकडे, इंग्लंडदेखील काही कमी नाही. आपले सुरुवातीचे तीन सामने गमावल्यानंतर इंग्लंडने जबरदस्त पुनरागमन केले आणि सलग पाच सामने जिंकून अंतिम फेरीत प्रवेश केला. मात्र, इंग्लिश संघ ऑक्टोबर २०१७ पासून आॅस्ट्रेलियाला पराभूत करू शकला नाही. ऑस्ट्रेलियाने इंग्लंड विरुद्ध गत सात सामने जिंकले आहेत. ऑस्ट्रेलियाने आपल्या गत ३८ वनडे पैकी ३७ सामने जिंकले आणि केवळ एक गमावला. इंग्लंडची फलंदाजी सरासरी २८.४२ राहिली आहे.

पाॅवर प्लेमध्येदेखील आॅस्ट्रेलियाचा दबदबा, फलंदाजीची सरासरी ५०
स्पर्धेच्या पाॅवरप्लेमध्ये देखील ऑस्ट्रेलियाचा दबदबा राहिला. त्यांची फलंदाजी सरासरी जवळपास ५० राहिली, तर प्रत्येक २४ चेंडूंवर एक बळी घेतला आहे. संघाने पॉवरप्लेमध्ये १३ बळी घेतले आणि आपले केवळ ७ गडी गमावले. दुसरीकडे, इंग्लंडने १२ गडी गमावले व केवळ ७ बळी घेतले. संघाने दोन वेळा सुरुवातीच्या १० षटकांत ५०+ धावा केल्या.

सलामी ऑस्ट्रेलियाची सर्वात चांगली, इंग्लंडची सर्वात खराब

यंदाच्या विश्वचषकात ऑस्ट्रेलिया आपल्या चांगल्या सुरुवातीमुळे यशस्वी ठरला. रचेल-हेनेस-एलिसा हिलीने ८ डावांत ६३.८७ च्या सरासरीने ५११ धावा काढल्या. यादरम्यान रन रेट ५.६ राहिला आणि दोन शतक व १ अर्धशतक काढले. या उलट इंग्लंडची सलामीची फळी अपयशी ठरली. टॅमी ब्यूमोंट-लॉरेन विलफील्ड व ब्यूमोंट-डॅनी व्याट यांची भागीदारीची सरासरी १२.५० राहिली. केवळ ३.७२ च्या रन रेटने १०० धावा काढल्या, ज्यात एकही अर्धशतक नाही.

बातम्या आणखी आहेत...