आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिला आयपीएल 3 मार्चपासून:साेनी, व्हायकाॅममध्ये प्रसारण हक्कासाठी चुरस, डिस्ने स्टार, साेनी नेटवर्कनेही भरली निविदा

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आता महिलांच्याही आयपीएल आयाेजनाचा निर्णय घेतला. याच लीगच्या आयाेजनाला आता वेग आला आहे. या पहिल्याच सत्राच्या आयपीएलच्या प्रसारण हक्कासाठीही अनेक कंपन्यांनी दावेदारी ठाेकली आहे. यासाठी सध्या साेनी, व्हायकाॅम, डिस्ने स्टार यांच्यात चुरस रंगली आहे. या प्रसारण हक्कासाठी बीसीसीआयने निविदा मागवल्या आहेत. या प्रसारण हक्कासाठी १० कंपन्यांनी निविदा दाखल केल्या आहेत. येत्या १२ जानेवारीपर्यंत या सर्वांना आपली बाेली निविदा दाखल करावी लागणार आहे. यातूनच आता एका कंपनीची निवड केली जाणार आहे.

मार्च महिन्यात महिलांच्या आयपीएलचे आयाेजन केले जाणार आहे. ३ ते २६ मार्चदरम्यान ही लीग हाेणार असल्याची माहिती बीसीसीआयच्या वतीने देण्यात आली. या लीगमध्ये पाच महिलांचे संघ सहभागी हाेतील. पहिल्यांदाच हाेत असलेल्या या महिलांच्या आयपीएल स्पर्धेत युवांना आपली क्षमता सिद्ध करण्याची माेठी संधी आहे.

बातम्या आणखी आहेत...