आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • Women's Team Wins ODI Series In England After 23 Years: British Lost By 88 Runs, Skipper Harmanpreet Hits 143 Off 111 Balls

महिला संघाने 23 वर्षांनंतर इंग्लंडमध्ये जिंकली वनडे सिरीज:ब्रिटिशांचा 88 धावांनी पराभव, हरमनप्रीतच्या 111 चेंडूत 143 धावा

5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

टीम इंडिया महिला क्रिकेट संघाने कॅंटबरी येथे इंग्लंडविरुद्धचा दुसरा सामना 88 धावांनी जिंकला. यासह टीम इंडियाने तीन सामन्यांच्या सिरिजमध्ये 2-0 अशी आघाडी घेतली आहे.

हरमनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखालील संघाने इंग्लंडच्या घरच्या मैदानावर 23 वर्षांनंतर ही वनडे मालिका जिंकली आहे. यापूर्वी 1999 मध्ये अंजुम चोप्राच्या नेतृत्वाखाली भारताने 2-1 असा विजय मिळवला होता.

1999 नंतर पहिल्यांदाच भारतीय महिलांनी इंग्लंडला त्यांच्या भूमीवर वनडे मालिकेत पराभूत केले आहे.
1999 नंतर पहिल्यांदाच भारतीय महिलांनी इंग्लंडला त्यांच्या भूमीवर वनडे मालिकेत पराभूत केले आहे.

पहिल्यांदा फलंदाजी करताना भारताने 50 षटकांत 5 गड्यांच्या मोबदल्यात 333 धावा केल्या होत्या. इंग्लंडविरुद्ध वनडेमध्ये टीम इंडियाची ही आतापर्यंतची सर्वोच्च धावसंख्या आहे. हरमनप्रीत कौरने झंझावाती खेळी करताना अवघ्या 111 धावा करत 143 धावा केल्या.

यादरम्यान तिच्या बॅटमधून 18 चौकार आणि 4 षटकार आले. हे तिचे वनडे क्रिकेटमधील 5 वे शतक ठरले. इंग्लंडमध्ये वनडेमध्ये शतक झळकावणारी ती पहिली आशियाची कर्णधार ठरली.

लक्ष्याचे पाठलाग करताना इंग्लंडचा संपूर्ण संघ 44.2 षटकांत 245 धावांत सर्वबाद झाला.

हरलीन देओलनेही ठोकले अर्धशतक

हरमनप्रीतशिवाय हरलीन देओलनेही शानदार फलंदाजी करताना 58 धावांची खेळी केली.
हरमनप्रीतशिवाय हरलीन देओलनेही शानदार फलंदाजी करताना 58 धावांची खेळी केली.

हरमनप्रीतशिवाय हरलीन देओलनेही या सामन्यात 58 धावांची शानदार खेळी केली. तिने 72 चेंडूंचा सामना केला. टीम इंडियाने शेवटच्या 24 चेंडूत 71 धावा जोडल्या. हरमनप्रीत कौर आणि दीप्ती शर्मा यांनी सहाव्या विकेटसाठी अवघ्या 24 चेंडूत 71 धावांची भागीदारी केली. या भागीदारीत दीप्तीने 15 धावांचे योगदान दिले. त्याचवेळी, हरमनप्रीतने आपल्या डावातील शेवटच्या 11 चेंडूंमध्ये 43 धावा केल्या.

रेणुका सिंगने घेतले 4 बळी

टीम इंडियासाठी वेगवान गोलंदाज रेणुजा सिंगने शानदार गोलंदाजी करताना 4 बळी घेतले. तिने 10 षटकात 57 धावा दिल्या. त्याचवेळी हेमलताला 2, तर दीप्ती सिंग आणि शेफाली वर्मा यांना 1-1 बळी मिळाले.

रेणुका सिंगने सामन्यात 4 विकेट घेतल्या आणि इंग्लंडला सामन्यात परतण्याची संधी दिली नाही.
रेणुका सिंगने सामन्यात 4 विकेट घेतल्या आणि इंग्लंडला सामन्यात परतण्याची संधी दिली नाही.

मानधनाने मोडला मिताली राजचा विक्रम

या सामन्यात स्मृती मानधनाने वनडे क्रिकेटमधील 3 हजार धावा पूर्ण केल्या. महिला वनडे सामन्यात ही कामगिरी करणारी ती तिसरी भारतीय खेळाडू ठरली. त्याच्या आधी भारताची माजी कर्णधार मिताली राज आणि सध्याची कर्णधार हरमनप्रीत कौर यांनी ही कामगिरी केली आहे.

तिने सर्वात जलद 3,000 धावा करण्याच्या बाबतीत माजी कर्णधार मिताली राजला मागे सोडले, ज्यांनी 88 डावात हा आकडा पार केला होता.

बातम्या आणखी आहेत...