आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलगच्या 7 पराभवानंतर भारताचा द.आफ्रिकेवर विजय:तिसऱ्या टी-20 त 48 धावांनी केला पराभव, हर्षलचे 4 बळी; चहलही चमकला

23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

टीम इंडियाने तिसऱ्या टी-20 सामन्यात द.आफ्रिकेवर 48 धावांनी विजय मिळवला आहे. क्रिकेटच्या तिन्ही फॉर्मेटच्या सलगच्या 7 पराभवानंतरचा हा भारताचा दक्षिण आफ्रिकेवरील पहिला विजय आहे. विशाखापट्टणममधील तिसऱ्या टी-20 सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 5 बाद 179 धावा केल्या. ऋतुराज गायकवाडने सर्वाधिक 57 धावांची खेळी केली. त्यानंतर प्रत्युत्तरादाखल मैदानात उतरलेला द.आफ्रिकेचा संपूर्ण संघ 19.1 षटकांत 131 धावांत तंबूत परतला. हर्षल पटेलने शानदार गोलंदाजी करत 4 विकेट्स पटकावले. तर चहलच्या खिशात 4 बळी गेले.

भारतीय गोलंदाजांपुढे आफ्रिकन फलंदाजांची नांगी

आफ्रिकेचा कर्णधार व सलामीवीर बावुमालाची बॅट तिसऱ्या सामन्यात तळपली नाही. तो केवळ 8 धावांवर बाद झाला. त्याचा विकेट अक्षर पटेलने घेतला.

तर त्याचा जोडीदार ड्वेन प्रिटोरियस 20 चेंडूत 23 धावा काढून बाद झाला. त्याला हर्षल पटेलने बाद केले. दोन्ही सलामीवीर बाद झाल्यानंतर आलेल्या रेसी वेन डर डुसेन यालाही फारशी कमाल दाखवता आली नाही. तो अवघ्या एका धावेवर बाद झाला. त्याला युझवेंद्र चहलने तंबूत पाठवले.

त्यानंतर धोकादायक वाटणाऱ्या ड्वेन प्रिटोरियसलाही चहलने आल्यापावली परत धाडले. त्याला 16 चेंडूत 20 धावा काढता आल्या. 9 षटकात चहलने चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर टाकला. या चेंडूने प्रिटोरियसच्या बॅटचा अलगद किनारा घेतला आणि तो पंतच्या हातात जाऊन विसावला.

कर्णधार पंतचा खराब फॉर्म कायम

टीम इंडियाचा कर्णधार ऋषभ पंतचा फ्लॉप शो तिसऱ्या टी-20 मध्येही कायम राहिला. त्याने 8 चेंडूत अवघ्या 6 धावा काढल्या. यापूर्वीच्या दोन सामन्यांत त्याने अनुक्रमे 29 व 5 धावा काढल्या होत्या.

ईशानचाही चांगला खेळ

या मालिकेत टीम इंडियाचा सलामीवीर ईशान किशनने जबरदस्त कामगिरी केली. तिसऱ्या टी-20 सामन्यात त्याने पुन्हा एकदा धमाकेदार फलंदाजी करत 35 चेंडूत 54 धावा काढल्या. यात 5 चौकार व 2 उत्तुंग षटकारांचा समावेश होता. त्याने 154.28 स्ट्राईक रेटने धावा काढल्या.

गायकवाडची धडाकेबाज खेळी

ऋतुराज गायकवाडने धडाकेबाज खेळी करत एनरिक नोर्त्याला एकाच षटकात 5 चौकार खेचले. 5 व्या षटकात हा प्रकार घडला. यामुळे नोर्त्या चांगलाच भांबावून गेला होता. षटकाचा शेवटचा चेंडू सोडला तर पहिले पाचही चेंडू सीमारेषेपार पोहोचले. गायकवाड 35 चेंडूत 57 धावा काढून बाद झाला. आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यातील त्याचे हे पहिलेच अर्धशतक आहे. त्याला केशव महाराजने तंबूत पाठवले.

तिसऱ्या सामन्यात उमरान मलिकला पुन्हा एकदा प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली नाही. पहिल्या दोन सामन्यात टीम इंडियाला झालेल्या दारूण पराभवानंतर आजच्या सामन्यात त्याला संधी मिळू शकते, असे मानले जात होते.

टीम इंडियाने आजचा सामना गमावला तर त्यांना मालिकाही गमवावी लागेल. याआधी दक्षिण आफ्रिकेने 2015 मध्ये भारतात वनडे आणि टी-20 मालिका जिंकली होती. त्यावेळी महेंद्रसिंग धोनी टीम इंडियाचा कर्णधार होता. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेने भारतात एकही मालिका जिंकलेली नाही. अशा परिस्थितीत आजचा सामना ऋषभ पंतच्या संघासाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात भारतीय संघ 4 विकेटने हरला. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिन्ही फॉरमॅटमध्ये भारताचा हा सलग सातवा पराभव ठरला. याआधी दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर भारताला सलग दोन कसोटी आणि तीन एकदिवसीय सामन्यांमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले होते.

जाणून घ्या खेळपट्टी कशी असेल आणि हवामानाची स्थिती

डॉ. वायएस राजशेखर रेड्डी ACA-VDCA क्रिकेट स्टेडियमची खेळपट्टी गोलंदाजांना मदत करू शकते. येथे गोलंदाज नेहमीच चांगली कामगिरी करत आले आहेत. खेळपट्टीची फिरकीपटूंना मोठी मदत होऊ शकते. आतापर्यंत येथे 2 टी-20 सामने खेळले गेले आहेत. दोन्ही वेळा प्रथम गोलंदाजी करणाऱ्या संघाने विजय मिळवला आहे.

या खेळपट्टीवर सर्वाधिक टी-20 धावसंख्या 127 धावांची आहे. येथे शेवटचा सामना 2019 मध्ये झाला होता. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा 3 गडी राखून पराभव केला. हवामानाबद्दल बोलायचे झाले तर, सामन्यादरम्यान हलके ढगाळ आकाश राहण्याची शक्यता आहे. तापमान 30 अंश सेल्सिअसच्या आसपास राहू शकते.

दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग इलेव्हन

भारत- ऋतुराज गायकवाड इशान किशन, व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, अक्षर पटेल आणि युजवेंद्र चहल.

दक्षिण आफ्रिका - रेझा हेंड्रिक्स, रेसी व्हॅन डर ड्युसेन, टेम्बा बावुमा (कर्णधार), हेन्रिक क्लासेन, ड्वेन प्रिटोरियस, डेव्हिड मिलर, वेन पेर्नेल, तबरीझ शम्सी, कागिसो रबाडा, एनरिक नॉर्ट्या, केशव महाराज.

बातम्या आणखी आहेत...