आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहिला वनडे विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात विक्रमी १७० धावा करणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या एलिसा हिलीला आयसीसी क्रमवारीत चार स्थानांचा फायदा झाला. ती जगातील नंबर-१ वनडे फलंदाज बनली आहे. तिने द. आफ्रिकेच्या लॉरा वॉल्वार्टला अव्वल स्थानावरून बाजूला केले.
फायनलमध्येच १४८ धावांची नाबाद खेळी खेळणाऱ्या इंग्लंडच्या नताली सीव्हरने दोन स्थानांनी सुधारणा करत दुसऱ्या क्रमांक गाठला. सीव्हरने अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीतही अव्वल स्थान मिळवले. तिने ऑस्ट्रेलियाच्या एलिस पेरीला दुसऱ्या क्रमांकावर ढकलले. अव्वल-१० फलंदाजांमध्ये ऑस्ट्रेलियाचे चार खेळाडू आहेत. भारताच्या मिताली राजने क्रमवारीत एक स्थान गमावले असून ती सातव्या स्थानावर घसरली. स्मृती मानधना एका स्थानाने सुधारून नवव्या स्थानावर पोहोचली. गोलंदाजीत इंग्लंडची सोफी एक्लेस्टोन अव्वल स्थान आणि भारताची झुलन गोस्वामी पाचव्या स्थानावर कायम आहे. दुसरीकडे, अष्टपैलू खेळाडूंमध्ये भारताची दीप्ती शर्मा सातव्या तर झुलन दहाव्या स्थानावर आहे.
अव्वल-5 फलंदाज
क्रम खेळाडू देश गुण
1. हीली ऑस्ट्रेलिया 785
2. सीव्हर इंग्लंड 750
3. मूनी ऑस्ट्रेलिया 748
4. वोल्वार्ट द. आफ्रिका 722
5. लेनिंग ऑस्ट्रेलिया 710
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.