आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातामिळनाडूविरुद्ध ११३ धावांची खेळी; पदार्पणात शतक साजरा करणारा चाैथा युवा संघाचा कॅप्टन विश्वविजेत्या भारतीय युवा संघाचा कर्णधार यश धुलने आपली विक्रमी कामगिरीची लय कायम ठेवताना रणजी ट्राॅफीत दमदार पदार्पण केले. त्याने ४९ दिवसांत तिसऱ्या विक्रमाला गवसणी घातली. आशिया स्पर्धा, वर्ल्ड चॅम्पियनपाठाेपाठ आता देशांतर्गत रणजी ट्राॅफीत पदार्पणात शतकवीर हाेण्याचा पराक्रम यशने गाजवला. दिल्ली संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या या १९ खेळाडूंनी तामिळनाडूविरुद्ध ११३ धावांची खेळी केली. यासह दिल्ली संघाने प्रथम फलंदाजी करताना दिवसअखेर सात गड्यांच्या माेबदल्यात २९१ धावा काढल्या.
आदित्य ठाकरेचे दाेन बळी : विदर्भ संघाकडून आदित्य ठाकरे, उमेश यादव, आदित्य सरवटेने प्रत्येकी २ बळी घेतले. त्यामुळे प्रथम फलंदाजी करणाऱ्या उत्तर प्रदेश संघाने दिवसअखेर ७ बाद २६८ धावा काढल्या आहेत.
रहाणे फाॅर्मात; द्विशतकी भागीदारी
सुमार खेळीमुळे अडचणीत सापडलेला अजिंक्य रहाणे ( १०८) अखेर फाॅर्मात आला. त्याने मुंबईकडून खेळताना गत चॅम्पियन साैराष्ट्रविरुद्ध नाबाद शतक झळकावले. याशिवाय सरफराजसाेबत चाैथ्या गड्यासाठी द्विशतकी भागीदारी रचली. यातून मुंबईने दिवसअखेर ३ बाद २६३ धावा काढल्या.
पदार्पणात पुण्याच्या पवनचे शतक
पुण्याच्या पवन शहाने रणजी ट्रॉफीमध्ये दमदार पदार्पण केले. त्याने महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करताना आसामविरुद्ध सामन्यात शानदार शतकी खेळी केली. ताे नाबाद १६५ धावांवर खेळत आहे. याच खेळीच्या बळावर अंकितच्या नेतृत्वात महाराष्ट्र संघाने दिवसअखेर ५ गड्यांच्या माेबदल्यात २७८ धावा काढल्या. आसाम संघाकडून हुसेनने शानदार गाेलंदाजी करताना तीन बळी घेतले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.