आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराटी-20 वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये टीम इंडियाच्या पराभवावर पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी ट्विटरवर टीम इंडियाची खिल्ली उडवली होती. आता त्याच्या या ट्विटला भारताचा माजी वेगवान गोलंदाज इरफान पठाणने चोख प्रत्युत्तर दिले आहे.
गुरूवारी टीम इंडियाच्या पराभवानंतर पाकिस्तानच्या पंतप्रधान शेहबाज शरीफ यांनी ट्वीट करत म्हटलं होते की, "तर आता या रविवारी 152/0 आणि 170/0 या दोघांमध्ये फायनल होणार आहे" असे शहबाज शरीफ यांनी ट्विट केले होते.
पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी केलेल्या या ट्विटमध्ये दोन स्कोअरचा उल्लेख आहे, पहिला स्कोअर तो आहे जो गेल्या वर्षी टी-20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानने भारताविरुद्ध लक्ष्याचा पाठलाग करताना केला होता, तर दुसरा स्कोअर इंग्लंडने भारताविरुद्ध टी-20 वर्ल्ड कपमध्ये केला होता.
पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या या ट्विटला उत्तर देताना इरफान पठाण यांनी लिहिले की, 'तुमच्यात आणि आमच्यात हाच फरक आहे. आमच्या सुखात आम्ही सुखी आणि दुसऱ्याच्या दुःखात तुम्ही सुखी. त्यामुळेच स्वत:चा देश सुधारण्याकडे तुमचे लक्ष नाही.
या ट्विटनंतर पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांना खूप ट्रोल व्हावे लागले. इंग्लंडविरुद्धच्या अंतिम सामन्यापूर्वी पत्रकार परिषदेत कर्णधार बाबर आझमलाही पत्रकारांनी या मुद्द्यावर प्रश्न विचारला.
बाबर आझम यांनी आपले मौन तोडत म्हटले की, 'आमच्यावर कोणताही दबाव नाही, पण मला या ट्विटबद्दल कोणतीही माहिती नसल्याने मी माफी मागतो. पण हो हे निश्चित आहे की आम्ही प्रतिस्पर्धी संघाविरुद्ध सर्वोत्तम खेळ करण्याचा प्रयत्न करू.
गुरूवारी इंग्लंडने भारताला पराभूत करून T20 विश्वचषक 2022 च्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. त्यांचा सामना 13 नोव्हेंबरला मेलबर्नमध्ये पाकिस्तानशी होणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.