आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

WTC फायनल अपडेट:सकाळी ऊन पडले, पहिल्या सेशनमध्ये पाऊस येण्याची शक्यता कमी; दुपारनंतर येऊ शकतो अडथळा

साऊथॅम्प्टनएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • इंटरनॅशनल क्रिकेट काउंसिलने या मॅचसाठी 23 जूनला रिझर्व डे ठेवला आहे.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलचा पहिला दिवस शुक्रवारी पावसामुळे वाया गेला. पुढील पाच दिवस देखील हवामानाचा अंदाज चांगला नसल्याचे बोलले जात आहे. दरम्यान शनिवारी काही सकारात्मक संकेत दिसले आहेत. साऊथॅम्प्टनमध्ये शनिवारी सकाळी ऊन पडले. अशी अपेक्षा आहे की आज नाणेफेक शक्य होईल आणि प्रेक्षकांना काही खेळही पाहायला मिळू शकतो.

दिनेश कार्तिकने पोस्ट केला फोटो
शनिवारी भारताचा माजी यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकने एक फोटो पोस्ट केला आहे. ज्यामध्ये सूर्य चमकत असल्याचे दिसून येत आहे. शुक्रवारी मुसळधार पाऊस पडला. अशा परिस्थितीत हे मैदान किती लवकर खेळण्या योग्य बनू शकेल हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. साऊथॅम्प्टनची ड्रेनेज सिस्टीम चांगली असल्याचे म्हटले जाते आणि पाऊस थांबला की मैदान40-45 मिनिटांतच खेळण्यायोग्य होऊ शकते असा दावाही केला जातो. शनिवारी दुपारनंतर पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

भारतीय खेळाडूंनी डार्ट खेळून दिवस काढला
शुक्रवारी दिवसभर अधून मधून पाऊस पडतो. अशा परिस्थितीत भारतीय संघातील अनेक खेळाडूंनी स्टेडियममध्येच डार्ट खेळून वेळ पार केली. भारताने यापूर्वीच प्लेइंग -11 ची घोषणा केली आहे. संघाचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर. श्रीधर म्हणाले की भारतीय प्लेइंग-11 अशा प्रकारचे आहे की, यामुळे प्लेइंग कंडीशन समीकरणातून बाहेर होते. तसेच, हे देखील संकेत देण्यात आले होते की, टॉसपूर्वी पुन्हा विचार करणे शक्य आहे.

23 मे रोजी आहे रिझर्व्ह डे
इंटरनॅशनल क्रिकेट काउंसिलने या मॅचसाठी 23 जूनला रिझर्व डे ठेवला आहे. जर मॅच ठरलेल्या पाच दिवसांमध्ये पूर्ण झाली नाही आणि जर खराब वातावरणामुळे ओव्हर वाया गेले तर रिझर्व्ह डेचा वापर केला जाईल.

बातम्या आणखी आहेत...