आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • Yashpal Sharma Death News | 1983 World Cup Winner Yashpal Sharma Passes Away Due To Heart Attack; News And Live Updates

मोठी बातमी:भारताचे माजी क्रिकेटपटू यशपाल शर्मा यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन, 1983 विश्वचषक विजेत्या संघाचे होते सदस्य

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • माझे आयुष्य दिलीप कुमार यांनी घडवले - यशपाल

भारताचे माजी क्रिकेटपटू यशपाल शर्मा यांचे मंगळवारी वयाच्या 66 व्या वर्षी निधन झाले आहे. ते 1983 विश्वचषक विजेत्या संघाचे सदस्य असून त्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. यशपाल शर्मा हे पंजाब राज्यातील लुनियाना शहरातील रहिवाशी होते. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर त्यांनी काहीकाळापर्यंत अम्पायर म्हणून काम पाहिले आहे. त्यानंतर भारतीय संघाचा निवडकर्ता म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती.

माझे आयुष्य दिलीप कुमार यांनी घडवले - यशपाल
भारताने पहिले विश्वचषक 1983 मध्ये जिंकले होते. यशपाल शर्मादेखील या संघाचे सदस्य होते. यशपाल शर्मा यांना सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू बनवण्यासाठी दिलीप कुमारांची मोठी भूमिका होती. या गोष्टीला स्वत: यशपाल शर्मा यांनी मान्य केले आहे. मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यँत दिलीप कुमार माझे आवडते असतील असे ते म्हणायचे. लोक त्यांना दिलीप कुमार म्हणायचे व मी त्यांना युसुफ भाई म्हणायचो.

बातम्या आणखी आहेत...